- महायुतीतील नेत्यांचा मविआवर हल्लाबोल
मुंबई,
विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव मान्य करण्याऐवजी महाविकास आघाडीतील नेते राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत. ईव्हीएममध्ये दोष काढत आहेत आणि मतपत्रिकांच्या जुन्या जमान्याकडे जाण्याचा आग्रह धरत आहेत, असा जोरदार हल्ला महायुतीतील नेत्यांनी चढविला. येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते Uday Samant उदय सामंत यांनी मविआवर टीका केली. विरोधकांच्या आघाडीचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळेच शनिवारी समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काल त्यांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आणि आज या सर्वांनीच सदस्यत्वाची शपथ घेतली. हा त्यांचा दुटप्पीपणाच आहे, असा आरोप उदय सामंत यांनी केला.
ईव्हीएममध्ये गडबड करणे शक्य आहे आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळाले, असा फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीकडून केला जात आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे कारस्थान विरोधकांनी नेहमीच केले आहे म्हणूनच जनता त्यांना शिक्षा करीत असते, असा दावा Uday Samant सामंत यांनी केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला. ज्यांचा सर्वच जण सन्मान, आदर करतात, ती ज्येष्ठ व्यक्ती पराभव मान्य करण्यास तयार नाही. उलट, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.