एक हजार हंगामी कामगारांना मिळेल रोजगार

08 Dec 2024 13:34:29
नागपूर, 
winter session 2024 विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार असून कुशल, अकुशल, असंघटित एक हजार ते बाराशे कामगारांना रोजगार मिळणार आहे. यात हंगामी कामगारांचाही समावेश असल्याने त्यांना हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा असते. कारण, या कामाच्या भरवशावर ते आथिर्क योजना आखतात. हेही वाचा : "हे सारे काँग्रेस सरकारचे पाप"- भाजपा
 
 
winter session 2024
 
 
winter session 2024 हिवाळी अधिवेशन व हंगामी कामगार यांचा जवळचा संंबंध आहे. कामगारांसाठी पोटापाण्याचा प्रश्न असतो. हंगामी कामगार कामाच्या आशेवर असतात. अनेक दशकांपासूनचा हा क्रम सुरू आहे. कधी काळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि  विविध  संघटनांच्या माध्यमातून कामगारांची नियुक्ती व्हायची आता कंत्राटदारामार्फत  कामगारांची नियुक्ती केली जाते. विधानभवन, देवगिरी, रामगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, सुयोग, शासकीय निवासस्थान, १६० खोल्यांचे गाळे आदी ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, इलेक्ट्रॉनिक  फिटिंग, वीज, पाणी, डागडुजीसह राहण्यासंबधी सोयी-सुविधा, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, बगीचा फुलवणे त्याच प्रमाणे खुर्च्या, टेबलची स्वच्छता, दुरुस्ती सर्व सामान व्यवस्थित लावणे आदी दैनंदिन कामासाठी मदत करण्यासाठी हंगामी कामगारांची नियुक्ती केली जाते. आठवडाभर चालणाऱ्या  अधिवेशनासाठी सर्व शासकीय बंगले आणि  शासकीय निवासस्थान सज्ज ठेवण्याची कामे अंतिम  टप्प्यात आली आहेत.
 हेही वाचा : पिकनिकला जाणाऱ्या शाळकरी मुलांची बस उलटली, 3 ठार
 
कार्यक्षमतेनुसार रोजगार देण्याचा प्रयत्न
winter session 2024 हिवाळी अधिवेशनाकारिता  नियमानुसार सर्व व्यवस्था करण्याकरिता कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते. कुशल मनुष्यबळ प्रशासकीय मार्गाने अथवा कंत्राटदारामार्फत  कंत्राटी पद्धतीने नियमानुसार पुरविण्यात येते. यासोबतच अकुशल व असंघटित कामगारांचीसुद्धा आवश्यकता असते. ती गरज पूर्ण करण्याकरिता स्थानिक खासदार, मंत्री व आमदार यांच्या शिफारस पत्रान्वये अथवा अधिकृत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत अधिवेशन कालावधीकरिता हंगामी रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
 
संजय उपाध्ये
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम
Powered By Sangraha 9.0