मुंबई,
Rekha-Amitabh-Kapil Sharma बाॅलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री रेखा आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या दिलखेचक अदा, त्यांच्या भरजरी रेशमी साड्या आणि पारंपरिक दागिने प्रत्येकालाच आकर्षित करतात. प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ही अभिनेत्री नुकतीच काॅमेडीयन कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शाे च्या दुसऱ्या सीझनमध्ये त्या पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या आणि तिथे त्यांनी स्वत:च्या खासगी आयुष्यातील काही किस्से शेअर केले.
Rekha-Amitabh-Kapil Sharma चाहत्यांसाेबत खासगी विशेषत: महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाेबतच्या स्पेशल बाॅण्डविषयी त्यांनी सांगितलं. कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असतानाच, रेखा यांनी ‘सुहाग’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासाेबत काम करतानाचा अनुभव सांगितला. कपिल शर्माने त्यांना विचारले की, तुम्ही मूळच्या दक्षिण भारतीय! तरीही तुम्ही इतका छान रास-दांडीया कसे खेळलात? तुम्ही गुजराती प्रकारचे हे नृत्य इतके छान कसे करू शकलात? हे कसे मॅनेज केले?
Rekha-Amitabh-Kapil Sharma या प्रश्नाचे जे उत्तर रेखाने देताच, कपिल अवाक हाेऊन त्यांच्याकडे बघत राहीला तर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या म्हणाल्या,‘हा विचार तर करा की, मी ज्यांच्यासाेबत दांडीया खेळत हाेते ते काेण आहेत? दांडीया खेळता येवाे किंवा न येवाे पण, जेव्हा त्यांच्यासारखी व्यक्ती समाेर असेल तेव्हा आपाेआपच शरीराचा प्रत्येक भाग ठेका धरून थिरकू लागताे.’ वर्ष 1979 मध्ये प्रदर्शित ‘सुहाग’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित झालेले ‘मां शेराेवाली’ गाण्याचा संदर्भ देऊन त्या बाेलत हाेत्या.