नागपूर,
कलिंगा bronze medal स्टेडियम, भुवनेश्वर येथे २५ ते २९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ गट अॅथ्लेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सात खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आज स्पर्धेच्या तिसर्या दिवशी ट्रॅक स्टार अॅथ्लेटिक्सस मिताली भोयरने ३००० मीटर दौडीत कांस्यपदक पटकाविले. तिने स्पर्धा ९.४५.२४ वेळ नोंदविली आहे. सुवर्ण पदक मध्यप्रदेशच्या सोनम परमार (९.४४.१६), रौप्यपदक गुजरातची शिल्पा दिहोरा (९.४४.५६) वेळेसह प्राप्त केले. तर नाम्ह्या फौंडेशनची आरती भगत बाराव्या स्थानी राहिली. तर मिताली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५००० धावणीत सातवे स्थान प्राप्त केले होते. मिताली पोलिस कार्यरत असून तिला रवींद्र टोंग आणि उमेश नायडू यांचेकडून प्रशिक्षण मिळाले आहे.
खेळाडूंनी bronze medal मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा अॅथ्लेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, गुरुदेव नगराळे, नागेश सहारे (नगरसेवक), डॉ. संजय चौधरी, सभापती उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, डॉ. विबेकानंद सिंह, रामचंद्र वाणी, एस. जे. अन्थोनी व अर्चना कोट्टेवार, राजेश भूते, चंद्रभान ब्रिजमोहन सिंघ रावत, कमलेश हिंगे, आशुतोष बावणे, निशांत डेहरिया, शुभम गौरव, पंकज करपे आदींनी खेळाडुंचे अभिनन्दन केले.