dia mirza दिया मिर्झाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिला पाहून सगळेच वेडे झाले होते. तिच्या चित्रपटांसोबतच दियाने तिच्या सौंदर्याचीही सर्वांना खात्री पटवून दिली. दियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज ९ डिसेंबरला बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा हिचा वाढदिवस आहे. दिया मिर्झा आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिच्या चाहत्यांची यादी भरपूर मोठी आहे. वयाच्या ४३ व्या वर्षीही दिया खूपच तरुण आणि सुंदर दिसते. दियाने २००१ मध्ये 'रेहना है तेरे दिल में' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तिच्या पहिल्याच चित्रपटापासून दीया सर्वत्र प्रसिद्ध झाली आणि प्रत्येक तरुणाच्या हृदयाची राणी बनली. पण, तिच्या शानदार पदार्पणानंतरही दियाला तिच्या व्यावसायिक आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. केवळ प्रोफेशनलच नाही तर दियाचे वैयक्तिक आयुष्यही संघर्षांनी भरलेले होते.
दिया आडनाव मिर्झा का वापरते?
दिया मिर्झाचा dia mirza जन्म ९ डिसेंबर १९८१ ला हैदराबादमध्ये झाला.तिचे वडील जर्मन व आई बंगाली हिंदू आहे. अभिनेत्रीच्या आईचे नाव दीपा व वडिलांचे नाव फ्रँक हेडेरिच आहे. अशा परिस्थितीत दियाच्या बाबतीत अनेकदा प्रश्न पडतो की ती जर्मन वडिलांची मुलगी व बंगाली आई असूनही मुस्लिम आडनाव का वापरते? खरं तर, दियाच्या जन्मानंतर अवघ्या चार वर्षांत तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, अभिनेत्रीच्या आईने हैदराबादचा रहिवासी अहमद मिराजसोबत पुन्हा लग्न केले. दियाच्या आईला तिच्या दुसऱ्या वडिलांनी मनापासून स्वीकारले व त्यासह त्यांनी तिला वडिलांप्रमाणे प्रेमही दिले. दियाला तिचे दुसरे वडील खूप आवडतात. म्हणूनच, तिने तिच्या नावासमोर तिचे दुसरे वडील अहमद मिर्झा यांचे आडनाव जोडण्यास सुरुवात केली.
वयाच्या १८ व्या वर्षी मिस एशिया पॅसिफिकचा किताब
दीया मिर्झा १६ वर्षांची dia mirza असताना काम करू लागली. तिने आपल्या करिअरची सुरुवात एका मल्टीमीडिया कंपनीतून केली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावला आणि त्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली. दियाने २००१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट 'रेहना है तेरे दिल में' हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि दिया पहिल्याच चित्रपटापासून स्टार बनली. या चित्रपटात ती अभिनेता आर. माधवन व सैफ अली खानसोबत दिसली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच या चित्रपटातील गाणी व दिया यांनाही प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.
२०२१ मध्ये वैभव रेखीसोबत लग्न केले
दिया मिर्झाने २०१४ मध्ये dia mirza पहिले लग्न केले. तिने तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगाला जोडीदार म्हणून निवडले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. काही वर्षांतच दिया पहिल्या पतीपासून विभक्त झाली. २०१९ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. साहिल संगापासून घटस्फोट घेतल्यानंतर वैभव रेखीने दियाच्या आयुष्यात प्रवेश केला. कोरोनाच्या काळात अभिनेत्रीने वैभव रेखीशी लग्न केले. तिने एका मुलाला जन्म दिला. दिया आता वैभव रेखीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.