डॉ.गोविंदा सांबळे यांचे तांबेरा रोगावर उपयुक्त संशोधन

उत्पादकता वाढ होऊन शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

    दिनांक :09-Dec-2024
Total Views |
अहिल्यानगर,
research on tambera deficiency राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते.अशातच हवामान बदल व पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. तांबेरा रोगाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन पिके वाचविण्यासाठी होत असलेल्या धडपडीला लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (‘महाज्योती’) चे संशोधक डॉ. गोविंदा राजेंद्र साबळे यांनी तांबेरा रोगावरही उपयुक्त संशोधन केले आहे.
 
  
nagar
 
 
 
पुण्यातील हवेली तालुका चिखली येथे राहणारे डॉ. गोविंदा साबळे यांच्या पीएचडीचा विषय ‘जेनेटिक एनालिसिस ऑफ फोटोपेरिओड इंसेन्सिटिविटि, लांग जुवेनाइल एंड रस्ट रेजिस्टेंस ट्रेट इन सोयाबीन’ असा होता. महाराष्ट्रातील प्रमुख पिकामधील एक पिक म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीन हे एक सूर्यप्रकाशा भोवती संवेदनशीलता दाखवणारे पिक आहे. गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे मान्सून ची आगमनाची वेळ सातत्याने बदलत आहे. अश्यातच सोयाबीनची पेरणी जर उशिरा झाली तर त्याच्या उत्पन्नात घट होते. उत्पन्न घटण्याचे कारण हे प्रामुख्याने त्याला लागणाऱ्या सूर्य प्रकाशाच्या अवधी वर आहे. विशिष्ट अवधी प्रमाणे जर पिकाला सूर्यप्रकाश भेटला नाही (११.८ तासांपेक्षा कमी ) तर पिकाच्या फुलोरा अवस्थेवर आणि परिपक्वतेवर परिणाम होऊन त्याची उत्पादन क्षमता घटते. त्यामुळे, त्यांनी या संशोधनामधे अशा काही जनुकांचा (QTL) चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे या सूर्य प्रकाश अवधी ला असंवेदनशीलता दाखवून योग्य प्रमाणात फुलोरा येण्यास कारणीभूत ठरतात. तर हि जनुके (E1, E2, E3, E4, E6) आपणास प्रामुख्याने EC 3909977 व AGS 25 या प्रजाती मध्ये आढळतात.
 
या प्रजातींचे आपल्या भागात येणाऱ्या सोयाबीन पिकात (KDS-753 व JS-2098) संक्रमण करून जनुक हस्तांतर करता येते. तसेच जनुक हस्तांतर केल्यामुळे त्याची फुलोरा येण्याची क्षमता व उत्पन्न हि सूर्य प्रकाशाच्या अवधी वर अवलंबून राहणार नाही. यासाठी डॉ. गोविंदा साबळे यांनी २ विभिन्न प्रजातीचे संक्रमण केले (JS-2098 x EC 390977 व KDS 753 x AGS 25). त्यापासून भेटणारे बिज आपण पुढचे 3 सिझन, क्षेत्रीय चाचणी करिता पेरणी केली. यानंतर त्यांच्या जनुकांचे हे लॅब मध्ये विश्लेषण केले. संक्रमण करून जे बीज उत्पादन भेटले ते डॉ. गोविंदा साबळे यांनी विद्यापिठातील संशोधन केंद्राला सादर केले आहे व पुढील चाचणी कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रस येथे सुरु आहे.
 संशोधनाला लागला ५ वर्षांचा अवधी
महाराष्ट्रातील सोयाबीन research on tambera deficiency पिकावर प्रामुख्याने येणाऱ्या तांबेरा ह्या रोगावर डॉ. गोविंदा साबळे यांनी दुसरे संशोधन केले आहे. या रोगाला महाराष्ट्रातील राहुरी विद्यापिठाने रोग प्रतिकारक जाती (KDS-753 व KDS-726) निर्माण केल्या आहेत. परंतु, कालांतराने या जातींची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली आणि उत्पन्न घटण्यास सुरुवात झाली. तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी डॉ. गोविंदा साबळे कनार्टक राज्यातील धारवाड येथुन EC-242104 या जातीचे बियाणे आणले. त्यासाठी, डॉ. गोविंदा साबळे यांना ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. या जातीचे संक्रमण आपण आपल्या भागातील प्रामुख्याने येणाऱ्या KDS-753 या जातीसोबत केले व त्या पासून भेटणाऱ्या बियांची चाचणी हि कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रज येथे केली. या चाचणी मध्ये येणाऱ्या बीज उत्पादनाची तांबेरा रोग प्रतिकारक क्षमता वाढल्याचे निदर्शनास आले.
डॉ. साबळे यांना संशोधनात जवळपास ५ वर्षाचा अवधी लागला. या काळात ‘महाज्योती’ने २०२१ पासून त्यांना अर्थसहाय्य केले. ज्यामुळे, त्यांनी यांचे संशोधन पूर्ण झाले. वरील केलेल्या संशोधनामधुन, आगामी काळात नक्कीच नव्या सोयाबीन पिकांचे वाण मिळतील. तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. डॉ.साबळे यांना ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचे सहकार्यासह वडिल राजेंद्र साबळे व आई संगिता साबळे यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’ संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.