नागपूर,
Vidyakunj प्रहार अशी संस्था आहे जिथे बालकांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासोबत सर्वांगीण विकास कसा होईल यावर विशेष लक्ष देत असते. संस्थेच्या सचिव फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे या यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. लहान वयापासूनच आत्मविश्वास स्वावलंबन आत्मरक्षा त्यासोबत व्यापारी ज्ञान या गुणांचा विकास या ठिकाणी केला जातो. यासाठी येथे विविध उपक्रम राबवले जातात.
बच्चों की सब्जी मंडी या उपक्रमाद्वारे भाजीपाल्याचे महत्त्व सांगणारा हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रहार वासुदेवलीला विद्याकुंजं याचे आयोजन प्रहार वासुदेव दिला कुंज ११४ पांडेला सोमवारी दिनांक २९तारखेला सकाळी साडेनऊ वाजतघेण्यातआला Vidyakunj या भाजी बाजाराचे उद्घाटन प्रसिद्ध आहार तज्ञ डॉ मनाली काळे यांनी केले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सहभाग विशेष उल्लेखनीय होता.
सौजन्य :संदीप तिजारे,संपर्क मित्र