तभा वृत्तसेवा
साकोली,
Dighori Gaon Chalo Mission : भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी गाव चलो अभियान अंतर्गत दिघोरी/मोठी येथे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले व युवकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकार व शिंदे फडणवीस सरकार यांच्या विविध योजनांची नागरिकांना माहितीही दिली.
जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी दिघोरी या गावात नवीन मतदार यादीचे विश्लेषण करून व पदाधिका-यांची बैठक घेत रात्री दिघोरी या गावातच मुक्काम केला व सकाळी गावातील आरोग्य सेविका आशा वर्कर यांची भेट घेतली. यावेळी महिलांना केंद्र व राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान योजनांची माहिती दिली. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत शालेय पोषण आहार ‘पौष्टिक खिचडी’ चा आनंद घेतला.
याप्रसंगी त्यांच्यासह दिघोरी/मोठी उपसरपंच विजय खोब्रागडे, मार्तंड हुकरे, ग्रा.पं.स. पद्माकर चेटुले, रमेश फुलबांधे, माजी सरपंच अरुण गभने, जिजराम हरणे, खुशाल निनावे, कृष्णा देशमुख व भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.