उमरखेड,
शहरातील मध्यवस्तीत ‘आसनमंडित’ स्वरूपात रिद्धीसिद्धी या मनोकामना पूर्ण करणार्या देवतांसह असलेल्या जागृत प्राचीन आणि विदर्भ मराठवाड्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ShriGanesh Jayanti Utsav श्रीसिद्धिविनायक मंदिर चौभारा देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 ते 15 फेब्रुवारी 2024 या तीन दिवसांच्या काळात श्री गणेश जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. दररोज सकाळी काकडा, भजन, श्रीअथर्वशीर्ष सामूहिक पठाण, श्रींची महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित आहेत. मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापन प्रमुख दीपक गो. देशमुख यांच्या हस्ते श्रींची महापूजा होऊन उत्सवाचा प्रारंभ होणार आहे.
ShriGanesh Jayanti Utsav : संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान भजन संध्या आयोजित असून श्री रुक्मिणी महिला भजनी मंडळाचा यात सहभाग असेल. रात्री कीर्तनमालेत सुप्रसिद्ध कीर्तनकार स्मिता आजेगावकर (पुणे) यांचे कीर्तन होईल. बुधवार, 14 फेब्रुवारीला दैनंदिन कार्यक्रमात गोपाल बजाज यांच्याहस्ते श्रीची महापूजा संध्याकाळी भजन संध्या कार्यक्रमात बसवेश्वर महिला भजनी मंडळ यांचा सहभाग असणार आहे. तर कीर्तनमालेत स्मिता आजेगावकर पुणे यांचे हरिकीर्तन होणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अर्चित प्रमोद शर्मा यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाल्यानंतर बाबुराव महाराज (तेरकर) यांचे काल्याचे सांप्रदायिक कीर्तन होणार असून गोपालकाला व महाआरती व त्यानंतर महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. उत्सव काळात दररोज सकाळी बसवेश्वर महिला मंडळाची काकडा, भजन, दिंडी शिवाजी वॉर्डातून निघून मंदिर परिसरात येणार आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.