मुनघाटे महाविद्यालयाला बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप

    दिनांक :13-Feb-2024
Total Views |
कुरखेडा, 
Badminton Championship : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या बॉल बॅडमिंटन संघाने गोंडवाना विद्यापीठाद्वारे विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचा 3 विरुद्ध 2 सेट ने पराभव करीत विद्यापिठाची चॅम्पियनशिप पटकाविली. तर मुलींच्या संघाने सेमीफायनलपर्यंत धडक दिली.
 
 
BALL
 
प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी क्रीडा मार्गदर्शक डॉ. दशरथ आदे, प्रा. हरीश बावनथडे, सतीश मुनघाटे यांच्या प्रशिक्षणात तयार झालेल्या या संघाचे प्रतिनिधित्व सुमित गाथे, टोकेश कोल्हे, हरीश नन्नावरे, भूषण डोकरमारे, साहिल पेंद्राम, लोचन झोडे, स्वप्नील मडावी यांनी तर मुलीच्या संघाचे प्रतिनिधित्व निकिता उईके, तामेश्‍वरी कोराम, दर्शना मडावी, संगीता नरोटे, कल्याणी उईके व पुनम रक्षा यांनी केले.
 
दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.