खामगाव :
Sant Tukaram Maharaj भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खामगावच्या वतीने आज 2 फेब्रुवारी रोजी शहरातून निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.खामगाव शहरात आज 2 फेब्रुवारी रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुणबी समाज बांधवांकडून खामगाव शहरातील प्रमुख मार्गाने भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा काढण्यात आली. या भव्य पालखी सोहळा व शोभा यात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खामगाव च्या वतीने भव्य दिव्य असे करण्यात आले.
भाजपा कार्यालय ,टॉवर चौक व त्यानंतर अकोला बाजार या मार्गाने जात असताना या पालखी सोहळा व शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले . तसेच यामध्ये सर्व सहभागी समाज बांधवांना थंड पेयाचे वितरण करण्यात आले. यावेळी खामगाव मतदार संघाचे लाडके आ. अँड आकाश फुंडकर, भाजपा सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, राजेंद्र धनोकार, खामगाव मतदार संघ प्रमुख संजय शिनगारे, खामगाव मतदारसंघ युवा मोर्चा प्रमुख पवन गरड, विनोदभाऊ टिकार ,नगरसेवक सतीशआप्पाजी दुडे,रमेश कावणे दिलीपभाऊ गुप्ता, पप्पू तोडकर, सौ भाग्यश्री मानकर , सौ लक्ष्मीताई मिश्रा ,सौ अनुराधा रोहनकार ,संतोष येवले ,रोहन जयस्वाल , भावेश दुबे ,अभय मिश्रा ,सर्वेश मिश्रा विकी हत्तेल , हितेश पद्मगिरीवार, यश आमले, प्रसाद यदलाबादकर, निकुंज मंदानी, श्री बापू देशमुख ,उमेश बंड, बंटी खंडेलवाल, मंगेश सावरकर , राज दिलीप पाटील, रवी गायगोळ पाटील ,शुभम देशमुख , प्रतीक मुंडे , आशिष सुरेखा , चंद्रकांत धोंडस, गोलू आळशी, आकाश बडासे, बाळूभाऊ पाटील ,रोशन गायकवाड, आदी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Sant Tukaram Maharaj यावेळी या शोभायात्रेत सहभागी असलेल्या सर्व महिला व पुरुष समाज बांधवांना थंड प्यायचे व शुद्ध पाण्याचे वितरण करण्यात आले त्यानंतर पालखी तील श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या घोषणेने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.