मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

24 Feb 2024 18:28:15
- महाळुंगी आश्रमशाळा तालुक्यातून द्वितीय

आर्णी, 
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या शासनाच्या स्पर्धात्मक अभियानांतर्गत स्व. सजनीबाई आडे विजाभज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा महाळुंगी ता. आर्णी या आश्रम शाळेची केंद्रस्तर व तालुकास्तर मुल्यमापन पथकांनी भेट दिली. यात शाळेन ताल्क्यातून द्वितीय क‘मांक पटकावला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान शासनामार्फत 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान प्रभाविपणे जिप शाळा, नप शाळा, ईतर मागास बहुजन कल्याणच्या शाळा, समाजकल्याण व शिक्षण विभागाच्या शाळेत राबवले. या उपक्रमाचे मुल्यमापन करण्यासाठी शासन स्तरावरून पथकाची नेमणुक करण्यात आली.
 
 
Mazi Shala Sundar Shala
 
प्रथम केंद्रस्तर पथकाने शाळेला भेटी दिल्या व नंतर केंद्रस्तर समितीत निवडलेल्या शाळेला तालुकास्तरीय मुल्यांकन समितीने भेट देऊन तालुक्यातुन व्यवस्थापन गटातुन प्रथम गुरूदेव विद्यामंदीर जवळा, द्वितीय स्व. सजनीबाई आडे विजाभज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा महाळुंगी ता. आर्णी, तृतीय एसपीएम हायस्कुल बोरगाव यांची नावे जाहिर करून माध्यामिक शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे पाठविले. या उपक‘मास शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या 23 नोव्हेंबर 2023 शासननिर्णयानुसार बक्षीस मिळणार आहेत.
 
 
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala : महाळुंगी आश्रम शाळेचा तालुक्यातुन द्वितीय कमांक आल्यामुळे शासन निर्णयानुसार दोन लाखाच्या बक्षीशास पात्र आहे. उपक्रमास प्रोत्साहीत करणारे संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह राणे, संस्थेचे सचिव अनिल आडे व संचालक मंडळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, सहायक आयुक्त समाज कल्याण मंगला मुन, समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, गटशिक्षणाधिकारी विलास मुळे, नगरपरिषद प्रशासन अधिकारी सचिन तिरपुडे, केंद्रप्रमुख विवेक कोषटवार, तालुका निमंत्रक चव्हाण, मुल्यमापण समितीचे पथक प्रमुख रवी राठोड व शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍यांकडुन आश्रम शाळेचे प्राचार्य भुपाल राठोड, शिक्षक, शालेय कर्मचारी व वस्तीगृह कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0