गोंदिया,
Vidyasagar Maharaj : आचार्य विद्यासागर महाराज यांच्या कार्य व जीवनाबद्दल काही बोलण्याची क्षमता माझ्यात नाही. मात्र ते सदैव सूर्यप्रकाशासारखे आपल्यामध्ये राहतील आणि आपल्याला शैव सत्य, अहिंसा आणि आचरण करण्याची प्रेरणा देत राहतील, अशी विनयांजली माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली.
![haskdf haskdf](https://www.tarunbharat.net/Encyc/2024/2/25/haskdf_202402251921497707_H@@IGHT_400_W@@IDTH_600.gif)
स्थानिक दिगंबर जैन समाजातर्फे गोरेलाल चौकात संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांना विनांजली अर्पण करण्यासाठी सामूहिक विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आचार्य विद्यासागर महाराजांचा गोंदियाला सदैव आशीर्वाद लाभला होता. त्यांच्या प्रेरणेने गोंदियाचे दिगंबर जैन मंदिर भव्यतेने व सौंदर्याने बांधले गेले. आचार्यांचे स्वदेशी अपनायो, पूर्णयु शांती धारा यांसारखे आयुर्वेदिक प्रकल्प, जीवनदायी उपक्रम, शेकडो गोशाळा सुरु आहे. त्यांनी हातमागाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशा अनेक जनउपयोगी उपक्रमातून ते सदैव आपल्यात राहतील, असे जैन म्हणाले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध समाजातील प्रमुख, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.