घोटी,
येथील श्री नृसिंह बहुउद्देशीय संस्था अंजी नृसिंह द्वारा संचालित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी शाळेने Mukhyamantri mazi shala sundar shala ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेत खाजगी अनुदानित गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत 3 लाख रुपयांच्या बक्षिसावर नाव कोरले.
Mukhyamantri mazi shala sundar shala : दुसर्या क्रमांक बाबासाहेब देशमुख विद्यालय पारवा व तिसरा क्रमांक संत गजानन महाराज आश्रम शाळा तिवसाळा यांनी पटकावला. जिल्हा परिषद शाळा गटातून जिल्हा परिषद शाळा सायतखर्डा प्रथम, जिल्हा परिषद शाळा पांढुर्णा द्वितीय क्रमांक तर तिसर्या क्रमांकावर जिल्हा परिषद शाळा माथणीने जागा मिळवली आहे. या प्रसंगी संस्थेचे सचिव मुकुंद कदम यांनी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विविध उपक‘मातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळेच ही शाळा पारितोषिक मिळविण्यासाठी पात्र ठरली, असे उद्गार शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव मेश्राम यांनी काढले.