कोण होती अनामिका बिश्नोई?

    दिनांक :26-Feb-2024
Total Views |
फलोदी
Anamika Bishnoi इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अनामिका विश्नोईची राजस्थानमधील फलोदी येथे भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ज्याने गोळी झाडली तो अनामिकाचा नवरा आहे. गोळीबाराचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनामिकाचा पती दुकानात घुसतो आणि आधी पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु अनामिका त्याला दुकान सोडण्यास सांगते. दरम्यान, रागाच्या भरात पती अनामिकावर एक नाही तर 2-3 गोळ्या झाडतो आणि तेथून पळ काढतो. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या भीषण घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. पतीने पत्नीवर अगदी जवळून गोळीबार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हल्ल्यात महिलेच्या मानेला दुखापत झाल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये असेही दिसून येते की, बंदुकीचा गोळीबार झाल्यानंतर आरोपीची बंदूक जाम होते, मात्र तो बंदुक पुन्हा लोड करून गोळीबार करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये तो अपयशी ठरतो आणि तो दुकानातून पळून जातो.
 
anamik
 
मृत महिला इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणारी होती आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अन्नी बिश्नोईच्या नावाने एक पेज आहे, ज्याचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती, असे सांगितले जात आहे. Anamika Bishnoi दरम्यान, महिराम बिश्नोई असे तिच्या पतीचे नाव आहे. रविवारी (25 फेब्रुवारी) ही महिला तिच्या दुकानात बसली असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे. महिला फलोदी येथे नारी कलेक्शन सेंटरचे दुकान चालवत होती. घटनेपूर्वी अनामिका आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता. महिला काउंटरच्या आत खुर्चीवर बसलेली दिसत आहे आणि तिचा नवरा काउंटरजवळ उभा आहे. वाद वाढत जातो आणि त्यादरम्यान तिचा नवरा बंदूक काढून पत्नीवर गोळीबार करू लागतो. सदर व्यक्ती घटनास्थळावरून फरार आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांनी व्हिडिओमध्ये महिलेची हत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली असून तो तिचा नवरा असल्याचा दावा केला आहे. हुंड्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने पतीनेच महिलेची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.