सन्मान व्हावा सत्कृतीचा...!

03 Feb 2024 19:56:23
रोखठोक
BJP-Advani-Ayodhya सुमारे १५ वर्षांपूर्वी, २००९ सालामधील फेब्रुवारी महिन्याच्याच २४ तारखेला मुंबईच्या षण्मुखानंद सरस्वती सभागृहात संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्याच्या आठवणी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आजही सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या जपलेल्या असतील. BJP-Advani-Ayodhya तेव्हाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, मुंबई आणि महाराष्ट्र भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना मुंबई भाजपाच्या वतीने ११ कोटी ११ लाख रुपयांची थैली पक्षनिधी म्हणून प्रदान करण्यात आली. जनसंघाच्या किंवा भाजपाच्या कार्यपद्धतीचे एक वैशिष्ट्य मानले जाते.BJP-Advani-Ayodhya  राजकीय आखाड्यातून होणाऱ्या विरोधाचा मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष असावा, या मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इच्छेतून स्थापन झालेल्या जनसंघाची उभारणी आणि संघटनात्मक बांधणी करताना कोणत्याही प्रस्थापित राजकीय घराण्याचे पाठबळ नव्हते. BJP-Advani-Ayodhya संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक समर्पित फळी या कामासाठी नियुक्त करण्यात आली आणि जनसंघ नावाचा राजकीय पक्ष तत्कालीन विरोधाचा मुकाबला करण्यासाठी तत्त्वनिष्ठ आणि सुसंस्कृत राजकारणाच्या ध्येयाने उभा राहिला. अशा पक्षांना जनाधार मिळविणे हे आव्हान असते.
आजचा अग्रलेख ... सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या शिलेदाराचा योग्य सन्मान !
 

BJP-Advani-Ayodhya 
 
 
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या पुण्याईच्या शिदोरीवर स्वातंत्र्यानंतरच्या सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला जनतेचा साहजिक कौल मिळाला होता. जनसंघासारख्या पक्षाला बांधणीपासूनचा श्रीगणेशा करावा लागला होता. अशा वेळी, पक्षाच्या संघटनात्मक उभारणीमध्ये झोकून देणाऱ्या नेत्यांच्या योगदानास जनतेची साथ मिळविण्याचेही आव्हान होते. BJP-Advani-Ayodhya जनसंघाने अल्पावधीतच ते मिळविले आणि पुढच्या प्रत्येक निवडणुकीत हा पक्ष सक्षम पर्यायाची ग्वाही देत वृqद्धगत होत गेला. पक्षाचा जनाधार वाढत होताच, पण पक्षाच्या उभारणीकरिता जनतेतून आर्थिक सहकार्याचेही हजारो हात पुढे येऊ लागले. फेब्रुवारी २००९ मधील तो सोहळादेखील तसाच होता. ११ कोटी ११ लाखांचा हा पक्षनिधी कोणा उद्योगपतींच्या पुंजीतून उभा राहिला नव्हता. महाराष्ट्राच्या ४० हजार ६०० चाहत्यांच्या देणगीतून उभारलेला हा निधी पक्षकार्यासाठी अडवाणीजींकडे सुपूर्द केला गेला आणि महाराष्ट्राने अडवाणीजींवरील श्रद्धेची पावती दिली. BJP-Advani-Ayodhya भारतीय जनता पार्टीने कधीच मतपेढीचे राजकारण केले नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्यांवर कधीच तडजोडही केली नाही. राष्ट्रहित हा भाजपासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि त्यासाठी कितीही कठोर अग्निपरीक्षा द्यावी लागली तरी भाजपा सदैव सिद्ध असेल, अशी ग्वाही त्या समारंभात अडवाणीजींनी दिली आणि सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक श्रोत्याने टाळ्यांचा गजर करत आसनावरून उभे राहात अडवाणीजींच्या वक्तव्यास प्रतिसाद दिला.
 
 
 
त्या समारंभाच्या काही महिनेच अगोदर मुंबईवर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला होता. अवघा देश या हल्ल्याने हादरून गेला होता आणि असुरक्षिततेची, भयाची चिंता मनामनांवर दाटली होती. BJP-Advani-Ayodhya अडवाणीजींच्या या शब्दांनी या चिंतेचे ओझे क्षणात उतरले. अडवाणीजींच्या या ग्वाहीला मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद हा जणू त्याचाच पुरावा होता. मतदारांनी भाजपाला दिलेले प्रत्येक मत हे सशक्त, सुरक्षित भारताला मिळालेले मत आहे, अशी ग्वाही त्याच सोहळ्यात अडवाणीजींनी दिली आणि त्याच सभेत २६-११ च्या हल्ल्यातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी नावाच्या आधुनिक लोहपुरुषाचे एक अनोखे, दिव्य दर्शन देशाला घडले. राष्ट्राच्या सुरक्षिततेस आव्हान देणाऱ्या शक्ती नामोहरम करण्यासाठी अडवाणी नावाच्या या नेत्याने कंबर कसली होती... त्याची प्रचीतीही देशाला आली. BJP-Advani-Ayodhya कारण, या नेत्याची अनेक कणखर रूपे त्याआधीही देशाने पाहिली होती. अडवाणीजींनी उभारलेले कोणतेही आंदोलन केवळ मतांच्या राजकारणाचे आंदोलन नव्हते. त्या प्रत्येकासोबत देशाच्या अस्मितेचा अंगार फुलविला गेला होता. म्हणूनच, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे भारताचे सुमारे पाचशे वर्षांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने साकारले, तेव्हा देशातील प्रत्येक रामभक्त नागरिकास राम जन्मभूमी मुक्तीसाठी अडवाणी यांनी उभारलेल्या त्या प्रखर राष्ट्रव्यापी आंदोलनाची आठवण झाली.
 
 
 
BJP-Advani-Ayodhya त्यांनी फुलविलेल्या राष्ट्रनिष्ठा आणि अस्मितेच्या अंगारातूनच हे दिव्य स्वप्न मूर्तरूपाने उभे राहिल्याची कृतज्ञ भावना देशभरातील रामभक्तांकडून व्यक्त झाली. भारताचे माजी उपपंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुसंस्कृत स्वयंसेवक, जनसंघाच्या स्थापनेपासूनचा पक्षाचा निष्ठावंत पाईक आणि भारतीय राजनीतीमधील एक भीष्माचार्य अशा अनेक रूपांनी उभ्या देशाला आणि जगालाही सुमारे सात दशकांहून अधिक काळ परिचित असलेले लालकृष्ण अडवाणी यांच्या समर्पित, राष्ट्रनिष्ठ आणि सुसंस्कृत जीवनकार्याच्या गौरवार्थ ‘भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली आणि देशभर समाधानाचे वातावरण पसरले. लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे श्रद्धेय नेतृत्व आहे आणि त्यांच्या जीवनकार्याविषयी प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यास परमोच्च आदर आहे, याची साक्ष पंतप्रधानांच्या या निर्णयातून देशाला पटली आहे. BJP-Advani-Ayodhya ९७ वर्षांच्या या तपस्वीच्या कार्यास मिळालेली ही देशाची पसंतीची पावती आहे. ८ नोव्हेंबर १९२७ रोजी तेव्हाच्या भारतातील कराची येथे जन्मलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी वयाच्या १५ व्या वर्षी, म्हणजे १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या नात्याने आपले जीवन राष्ट्रकार्यासाठी अर्पण केले. आज वयाच्या ९७ व्या वर्षीपर्यंतचा प्रवास त्याच समर्पणभावनेने सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा त्यांचा आनंद काहीसा अल्पजीवी ठरला.
 
 
पाकिस्तानातून बेघर स्थितीत भारताचा आश्रय घेणाऱ्या लाखो हिंदूंसोबत तेथील सारे काही मागे सोडून भारतात आश्रय घेण्याची वेळ त्यांच्यावरही आली. मात्र, पहिल्या स्वातंत्र्यदिनानंतरच्या रक्तरंजित व दहशतीच्या सावटाखालील आठवणींनादेखील त्यांच्या मनात कटुतेला थारा मिळाला नाहीच, उलट, धर्मनिरपेक्ष भारताच्या निर्मितीच्या ध्यासाने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला नवी दिशा मिळाली. BJP-Advani-Ayodhya तरीही या घटनेमुळे कदाचित त्यांच्या राष्ट्रनिष्ठेला तेजस्वी धार प्राप्त झाली असावी. भारताच्या दुर्दैवी फाळणीनंतर महिनाभरात, १२ सप्टेंबर १९४७ रोजी पाकिस्तानातून दिल्लीत दाखल झालेल्या अडवाणीजींनी पुढे चार वर्षे अल्वार, भरतपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे संघाच्या कामात स्वतःस झोकून दिले. संघटक म्हणून व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या संघाच्या मुशीत तयार झाल्यानंतर १९५७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याकरिता ते दिल्लीत दाखल झाले. BJP-Advani-Ayodhya प्रत्यक्षात, जनसंघाच्या स्थापना दिनापासून त्यांचा राजकीय कारकीर्दीचा प्रवास सुरू झाला. १९५८ पासून जनसंघाचे दिल्लीचे राज्य सचिव म्हणून काम करत असतानाच ‘ऑर्गनायझर' या जनसंघाच्या राजकीय साप्ताहिकाच्या सहसंपादकपदाची जबाबदारीही त्यांनी शिरावर घेतली. १९७० मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून दाखल झाल्यापासून सुरू झालेल्या सत्ताकारणाच्या प्रवासात, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे यशस्वी आणि कणखर गृहमंत्री आणि राष्ट्रनिष्ठेच्या प्रतीकांचे सामाजिक पुनरुज्जीवन करणाऱ्या आंदोलनांचा लोकमान्य प्रणेता, देशाचे उपपंतप्रधान अशा विविध भूमिका सक्षमपणे बजावणाऱ्या अडवाणीजींनी आपल्या राजकीय अनुभवातून देशाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यातील आपला वाटा समर्थपणे पेलला आहे.BJP-Advani-Ayodhya
 
 
 
आणिबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पार्टीच्या सत्ताकाळातील सहभागी पक्षांमधील काही क्षुल्लक वादातून बाहेर पडून जनसंघाने भारतीय जनता पार्टी या नावाने राष्ट्रीय राजकारणात आपली मोहर उमटविण्यास जोमदार प्रारंभ केला होता. तो पक्षाच्या दृष्टीने आव्हानाचा काळ होता. नव्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याची मोठी जबाबदारी पहिल्या फळीतील नेत्यांवर होती. १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८६ ते १९९० या काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अडवाणी यांची निवड झाली. BJP-Advani-Ayodhya १९९३ ते १९९८ आणि २००४-२००५ असा सर्वाधिक काळ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या अडवाणी यांच्या तीन तपांच्या संसदीय राजकीय कारकीर्दीतून घडलेल्या अविरत देशसेवेचा, प्रखर हिंदुत्वनिष्ठेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा ‘भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने यथोचित सन्मान झाला आहे. एक प्रखर बुद्धिवान व तत्त्वनिष्ठ विचारवंत, भारतमातेला परम्वैभव प्राप्त करून देण्याच्या ध्यासाने झपाटलेला राजकीय नेता म्हणून देशातील नागरिकांच्या तीन पिढ्या अडवाणी यांना ओळखतात. अडवाणी यांच्याविषयीच्या आदरभावामध्ये कोणत्याही राजकीय मतभेदांची दरी नाही, हे त्यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत अद्वैतरूपाने सोबत असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या प्रखर राष्ट्रीयत्वाच्या तत्त्वांसोबत कधीही तडजोड केली नाही, तरीही वेळकाळाचे भान ठेवून व परिस्थितीची गरज ओळखून राजकीय लवचीकता दाखवत त्यांनी त्या त्या काळास योग्य आणि आवश्यक तोच प्रतिसादही दिला आहे.BJP-Advani-Ayodhya 
 
 
भारतीय जनता पार्टी हा देशाच्या राजकारणातील एक सशक्त, सक्षम आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष व्हावा या महत्त्वाकांक्षेने १९८० ते १९९० या दशकात अडवाणी यांनी संघटनात्मक कार्यात स्वत:स अक्षरशः झोकून दिले आणि १९८९ च्या निवडणुकीतील भाजपाच्या यशाने त्यांच्या परिश्रमाची फळे अधोरेखित केली. १९८४ मध्ये लोकसभेत असलेले दोन खासदारांचे संख्याबळ १९८९ मध्ये ८६ पर्यंत बळावले आणि पक्षाच्या जनाधाराचा आलेख पुढे सातत्याने उंचावत राहिला. १९९२ मध्ये लोकसभेत भाजपाच्या खासदारांची संख्या १२१ वर पोहोचली आणि १९९६ मध्ये १६१ चे संख्याबळ गाठून भारतीय जनता पार्टी हा काँग्रेसच्या राजवटीला भक्कम, सशक्त पर्याय म्हणून जनतेसमोर जाण्यास सिद्ध झाला. BJP-Advani-Ayodhya भाजपाचा भक्कमपणे वाढणारा जनाधार ही भारतीय संसदीय लोकशाहीतील ऐतिहासिक बाब या विजयाने अधोरेखित केलीच, पण त्याचे शिल्पकार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावर जनमान्यतेची मोहरही उमटली. सत्तेच्या मक्तेदारीची काँग्रेसी भावना याच विजयामुळे उन्मळून पडली आणि भारतीय जनता पार्टी हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. केवळ सत्ताकारणातील सक्षम नेतृत्व एवढीच लालकृष्ण अडवाणी यांची ओळख नाही. चरैवेति हे भारतीय जनजीवनाच्या संस्कृतीचे प्राचीन वैशिष्ट्य आहे. तीर्थाटन ही भारतवासीयांची पारंपरिक श्रद्धा आहे आणि त्यासाठी भ्रमण ही सांस्कृतिक परंपरा आहे. सण, उत्सवांचे उत्साहात साजरेपण हे भारतीय जीवनशैलीचे वैशिष्ट्य आहे आणि या परंपरा भारतीय संस्कृतीत भक्कमपणे रुजलेल्या आहेत.
 
 
BJP-Advani-Ayodhya परंपरा आणि नवता यांना जोडणारा हाच अनोखा धागा भारतात पिढ्यान्पिढ्यांपासून जपला गेला आहे. सर्वसमावेशकता आणि सामाजिक सहभाग हे यांचे अनोखेपण आहे. १९९० मध्ये या धाग्याची वीण उसवण्याचे काही अप्रिय प्रयत्न देशात सुरू झाले आणि एका बिकट सामाजिक समस्येची जखम भळभळू लागली. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून त्यास खतपाणी घालण्याची धडपड सुरू झाली आणि परंपरांना व श्रद्धास्थानांना आव्हान देत भारतीय अस्मिताचिन्हे पुसून टाकण्याच्या प्रयत्नांचा पाडाव करण्याच्या उद्देशाने लालकृष्ण अडवाणी नावाचा हा नेता मैदानात उतरला. भारतीय संस्कृती, परंपरांचे आणि अस्सल भारतीयत्वाचे तेजस्वी प्रतीक असलेले प्रभू श्रीराम हे अडवाणी यांच्या संघर्षाचे चिन्ह बनले आणि अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्ती संघर्षाला राष्ट्रव्यापी आयाम प्राप्त झाला. BJP-Advani-Ayodhya ज्या भावनांनी, अस्मितांनी आणि श्रद्धास्थानांनी देशाचे ऐक्य हजारो वर्षांपासून अबाधित आणि अभंग राखले, त्या भावनांच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा या श्रद्धास्थांनांचा धागा भक्कम करण्याच्या राजकारणापलीकडच्या प्रयत्नांना आंदोलनाचे रूप आले आणि उभा देश सांस्कृतिक व धार्मिक अस्मितांच्या रक्षणासाठी संघटित होऊ लागला. तीर्थाटन, पर्यटन, यात्रा ही पारंपरिक प्रथा पुनरुज्जीवित करून राम रथयात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या ऐक्याचे अनोखे दर्शन घडविण्याचा हा एक वेगळा प्रयोग अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता. हा प्रयोग केवळ राम मंदिराच्या उभारणीचा नव्हता, तर राम मंदिराच्या रूपाने राष्ट्रमंदिर उभे राहावे यासाठीचा ठरला.
 
 
 
वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त झाल्यानंतरची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती देशाने अनुभवली आहे. याच काळात, १९९३ मध्ये तेव्हाच्या नरसिंहराव सरकारने ८० व्या घटनादुरुस्तीचा घाट घातला आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातही सुधारणा करणारे विधेयक प्रस्तुत केले. याच्या विरोधात पुन्हा एकदा रण माजविण्याचा निर्धार करून देशाच्या चार भागांतून ११ सप्टेंबर १९९३ या स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी भाजपाने जनादेश यात्रा आरंभली. BJP-Advani-Ayodhya धर्म आणि राजकारण या बाबी जनजीवनाचे अभिन्न भाग असल्याने त्यांना परस्परांपासून अलग करण्याचा प्रयत्न केल्यास सार्वजनिक नैतिक मूल्ये पायदळी तुडविली जातील, अशी भूमिका घेत अडवाणींनी जनमत संघटित करण्यास सुरुवात केली. राजकारणातील धर्म नव्हे, तर अधर्माचे उच्चाटन करावयास हवे, अशी साद घालत त्यांनी या यात्रेतून पुन्हा देशात चैतन्य फुलविले. १४ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास करून २५ सप्टेंबरला या यात्रेचा भोपाळमध्ये प्रचंड जाहीर सभेत समारोप झाला, तेव्हा देशात अडवाणी यांच्या नेतृत्वाने नव्या जागृतीचे पर्व सुरू केले होते. व्यापक जनारोषाच्या भयामुळे राव सरकारची ही विधेयके बासनात गुंडाळली गेली.
 
 
६ एप्रिल ते १० मे २००६ या काळातील भारत सुरक्षा यात्रेतून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी लालकृष्ण अडवाणी हेच नाव आघाडीवर होते. संसदीय लोकशाही वाचविणे, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य, भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्ती, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास आळा, हे मुद्दे केवळ राजकीय नव्हते. BJP-Advani-Ayodhya सर्वसामान्य जनतेच्या भावनांचे ते प्रतिबिंब होते. अडवाणी यांनी जनतेचा आवाज होऊन या मुद्यांवरून देश ढवळून काढलाच, पण, यात्रा ही भारतीय संस्कृतीची परंपरा, सामाजिक ऐक्याचा धागा ठरते हेदेखील सिद्ध करून दाखविले. भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांचे जीवन ही भारतीयांची प्रेरणा आहे. प्रखर राष्ट्रनिष्ठा, समर्पणवृत्ती आणि त्यागभावना ही या जीवनाची त्रिसूत्री आहे. भारतरत्न पुरस्काराने या ऋषितुल्य प्रेरणास्थानाचा होणारा सन्मान हे समस्त भारतीयांच्या त्यांच्याविषयीच्या आदरभावनेचे प्रतिबिंब आहे. भारतीय समाज नेहमीच सत्कार्याचा सन्मान करतो. राज्यकर्त्यांनी अडवाणी यांना हा पुरस्कार देऊन भारताच्या या परंपरेचेच पालन केले आहे. म्हणून अडवाणी यांचे विनम्र अभिनंदन करताना, भारत सरकारचे आभारही मानायलाच हवेत. BJP-Advani-Ayodhya
Powered By Sangraha 9.0