राजकारणातील ‘यात्रा’ संस्कृतीचे जनक लालकृष्ण अडवाणी!
दिनांक :03-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Lal Krishna Advani भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. ते केवळ भाजपचे दिग्गज नेते नाहीत तर पक्षाचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. भारतीय जनता पक्षाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी. भारतीय राजकारणात ‘यात्रा’ संस्कृती सुरू करणारे नेते म्हणजे लालकृष्ण अडवाणी. ज्या वेळी अयोध्येत राम मंदिराची मागणी जोरात होती, त्याच वेळी लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती, त्यामुळे देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचे राजकारण उदयास येऊ लागले होते. मात्र, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूरमध्ये अटक केली होती. या घटनेनंतर लक्षकृष्ण अडवाणी हे राजकारणातील हिरो म्हणून उदयास आले. भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर