मराठीतूनच संवाद साधण्यासाठी आग्रही राहा

04 Feb 2024 21:44:00
- न्या. मृदुला भाटकर यांचे आवाहन

जळगाव, 
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा केंद्राचा धोरणात्मक निर्णय आहे. तोपर्यंत मराठी भाषिकांनी न्यूनगंड झटकत सार्वजनिक पातळीवर एकमेकांशी मराठी भाषेतूनच संवाद साधावा. मराठीतून संवाद व्हावा यासाठी आग्रही राहावे. राज्य शासनाने शासननिर्णय जाहीर करण्याची गरज असल्याचे मत Mridula Bhatkar न्या. मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले.
 
 
Mridula Bhatkar
 
’अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का?’ या विषयावर अभिरूप न्यायालय पार पडले. अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून Mridula Bhatkar न्या. मुदृला भाटकर यांनी काम पाहिले. शासनाच्यावतीने वकील म्हणून नीलम गोर्‍हे यांनी काम पाहिले. साक्षीदार म्हणून डॉ. गणेश चव्हाण, प्रा. एल. एस. पाटील, मराठी भाषा विभागाचे संचालक श्यामकांत देवरे यांनी आपले मत मांडले. याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून अ‍ॅड. सुशील अत्रे, याचिकाकर्ते म्हणून पत्रकार विनोद कुलकर्णी, अ‍ॅड. दिलीप पाटील यांनी आपले मत मांडले.
 
 
 
अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, मराठीच्या योग्य वापरासाठी क्षेत्र तयार आहेत; मात्र अभिजात दर्जासाठी शासनाकडून अधिक प्रयत्न होणे आवश्यक असून, त्याकरिता सकारात्मक भूमिका घेऊन कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत. विनोद कुलकर्णी म्हणाले की, भाषेला दर्जा मिळावा यासाठी निवेदने देण्यात आली. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मराठी साहित्य परिषदेने यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारकडे अभिजात भाषेच्या दर्जासाठी अधिक प्रयत्न करावे.
 
 
 
Mridula Bhatkar : शासनाच्या वतीने साक्षीदार म्हणून एल. एस. पाटील यांनी बाजू मांडली, ते म्हणाले, शासनाने अलिकडच्या काळात विविध शब्दकोश तयार केले आहेत. इंग्रजीमधून शिकविले जाणारे अभ्यासक्रम मराठीत केले जात आहेत. मात्र विद्यापीठ स्तरावरूनही यात अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहेत. डॉ. दिलीप पाटील म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात सध्या मराठीत व्यवहार होत आहे. त्यामुळे मराठीच्या अभिजात भाषेसाठी वैद्यकीय क्षेत्र सज्ज आहे.
 
 
डॉ. गणेश चव्हाण म्हणाले की, जगातील सर्व भाषेत बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये मराठी 22 व्या क्रमांकावर आहे. भारतात ती तिसर्‍या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषा दोन हजार वर्षे जुनी आहे. गाथासप्तशती हा ग्रंथ 1500 वर्षांपूर्वीचा आहे. येत्या काळात मराठीला निश्चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0