अर्जुनी मोरगाव,
Saraswati Vidyalaya : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत स्थानिक सरस्वती विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेत 13 विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत, 24 विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत तर 63 विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले. ‘अ’ श्रेणी मध्ये भाग्यश्री भैसारे, भावना ब्राह्मणकर, स्वरित धकाते, दिया ढाली, लीना ढोमणे, आस्था घनाडे, अनुष्का कारेवार, रोशनी मानकर, स्नेहा नाईक, वैष्णवी नाकाडे, राशी शहारे, सिया उईके, गोजिरी उके उत्तीर्ण झाले.
या Saraswati Vidyalaya विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल व शिक्षकवृंदानी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक रूपराम धकाते यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.