रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 9, 10 फेब्रुवारीला सुशासन महोत्सव

05 Feb 2024 19:38:13
नवी दिल्ली, 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 9 आणि 10 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत Sushasan Mahotsav सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
 
 
Sushasan Mahotsav
 
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मुलाखती या महोत्सवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मंत्रालये तसेच राज्य सरकारांकडून विविध कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचे प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आले आहे. पूनावाला फिनकॉर्प या सुशासन महोत्सवाचे प्रायोजक तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेज सहप्रायोजक आहेत. Sushasan Mahotsav सुशासन महोत्सवात विविध राज्यातील तसेच स्वयंसेवी संघटनांचे दीड हजारावर प्रतिनिधी सहभागी होणार आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि Sushasan Mahotsav सुशासन महोत्सवाचे मुख्य समन्वयक प्रो. पीयूष गिरगावकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0