यवतमाळ,
ज्येष्ठ नागरिक मंडळाचा Vardhapan din sohala वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. सुनील भड यांनी दृकश्राव्य माध्यमातून नेत्ररोग, चिकिस्ता व उपचार याबद्दल संबोधित केले. तसेच सदस्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान करत ज्येष्ठांसाठी सवलतींची घोषणाही केली. ओंकार ढोले व वासुदेव कांबळे यांनी नोंदणी व्यवस्था केली. मान्यवरांचे स्वागत ओंकार ढोले, डॉ. सीबी अग्रवाल, डॉ अप्पासाहेब वानखडे व उपाध्यक्ष विनोद सहस्रबुद्धे यांनी केले. ज्येष्ठ सदस्य प्रभाकर देशपांडे यांनी गीत सादर केले.
Vardhapan din sohala : कार्यकारी अध्यक्ष राजन टोंगो यांनी मनोगत वक्त केले. यावेळी ज्येष्ठ सदस्य विलास गोखले यांनी विचार मांडले. वर्षभरातील कामाचे सादरीकरण सचिव पांडुरंग मुसळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय उपलेंचवार व अनिल दुर्गे यांनी करून दिला. तर पाहुण्यांचा सत्कार श्रीराम भास्करवार, प्रकाश दामले, वासुदेव कांबळे यांनी केला. मुख्य मार्गदर्शन डॉ. देवेंद्र पुनसे यांनी केले. अध्यक्षीय भाषण बळवंत चिंतावार यांनी केले. मंडळाचे संचालक श्रीराम भास्करवार यांनी ज्येष्ठांसाठी समाजमाध्यमावर आलेले उपयुक्त व सुंदर विचार वाचून दाखवले.