जीवन जिज्ञासा
- प्राचार्य प्रमोद डोरले
shriram-ayodhya २२ जानेवारी २०२४ हा दिवस आधुनिक आणि स्वतंत्र भारताच्या कालखंडातील सुवर्णाच्या अक्षरांनी इतिहासाच्या पृष्ठावर अंकित केला जाईल. कारण, सुमारे ५०० वर्षांनंतर सूर्यकुलोत्पन्न प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येला लागलेले ‘ग्रहण' सुटले. shriram-ayodhya प्रभू श्रीरामचंद्र आपल्या जन्मस्थळी मोठ्या वैभवाने गाजावाजा करत, वेदमंत्रांच्या उच्चरवाने आणि जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणांनी आपल्या पूर्ण वैभवासह विराजमान झाले. वेदमंत्रांच्या उच्चारांनी अयोध्येच्या मंदिराचा गाभारा झंकृत झाला, स्पंदित झाला. shriram-ayodhya लक्षावधी रामभक्तांच्या, साधू, संत, महंत. कारसेवकांच्या संतृप्त आणि भक्तियुक्त अंतःकरणातून प्रस्फुटित झालेल्या ‘जय श्रीराम'च्या गगनभेदी गजरांनी आसेतुहिमाचलच नव्हे, तर लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्सपासून तो अमेरिकेतील रस्त्यांवरही ‘जय श्रीराम'चा मंत्रघोष दुमदुमला. shriram-ayodhya एका अर्थाने रामकथा भारताच्या सीमा पार करून जगामध्ये पसरली. श्रीसमर्थांच्या मनीची आस तर श्रीरामकथा ब्रह्मांडालाही भेदून पलीकडे जावी अशी होती. श्री प्रभू रामचंद्र हे तर ब्रह्मांडनायकच आहेत. shriram-ayodhya त्यामुळे ते संपूर्ण चराचरातच आहेतच; पण भौतिक सीमांनी, मर्यादांनी आवृत्त असलेल्या जगाच्या दृष्टीने आज ती संपूर्ण जगात पसरली, इतके मात्र निश्चितच म्हणता येईल. त्या म्हणण्याला एक विधान अधिक जोडणे आवश्यक आहे. ते म्हणजे ‘श्रीरामकथा' पुन्हा एकदा भारताच्या सीमा ओलांडून आधुनिक मानवाच्या मनात प्रवेश करती झाली. shriram-ayodhya त्याच्या आकलनासाठी आपल्याला इतिहासाची काही पाने उलटावी लागतील.
इतिहासाची पुनरावृत्ती
इतिहासाच्या अनुशीलनाने हे लक्षात येते की, इसवी सनाच्या प्रारंभ काली ‘कुशाण' वंशाचे राज्य काशीपासून तो खोतानपर्यंत पसरले होते. त्यामुळे त्याच्या अधिपत्याखाली असलेले देश भारतीय संस्कृतीमुळे, साहित्यामुळे प्रभावित होणे स्वाभाविक होते. हा संपर्क प्रस्थापित होण्याचे आणखी एक कारण म्हणजे इ. स. ८५ ते १०५ या कालखंडात चिनी सम्राट ‘हो-ती' याचा सेनापती यात् घाव याने मध्य आशियात केलेल्या स्वाèया होत. त्यामुळे चीन आणि मध्य आशिया यांचा परस्परांशी चांगलाच संबंध आला. भारतीय साहित्याचा प्रभावही खूप वाढला. त्याचा परिणाम म्हणजे इ. स. ४७२ मध्ये चि-चिया-यन् याने ‘पाओ त्सांग-चिंग' या त्याच्या ग्रंथाचा प्रारंभच रामायणाने केला. ‘चि-चिआ-य' हे संस्कृतच्या ‘केकेय' नावाचे रूपांंतर आहे. या ग्रंथाच्या उपसंहारात रामराज्याचे मोठे गुणगान केले आहे. इ. स. ५८० मध्ये नेपाळचा अधिपती ‘अशुवर्मा' याच्या मुलीचा विवाह ‘ल्हासाङ्क येथे करण्यात आला. त्या काळी भारतात बौद्ध धर्माचे चांगलेच प्रभुत्व होते. ‘अनामकं जातकम्' या बौद्ध जातकाचे ‘कांग-से-इ' नावाच्या चिनी लेखकाने चिनी भाषेत रूपांतर केले. त्यात राम सीतेचा वनवास, सीताहरण, जटायूचा वृत्तांत, बाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा या रामायणातील सर्व प्रमुख घटनांचा उल्लेख केला आहे.
सायबेरिया
सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देश आहे. यालाच प्राचीन भारतीय साहित्यात ‘शिबिर देश' म्हणून उल्लेखिल्या जात असे. मंगोलियाच्या क्षेत्रात तसेच रशियामधून वाहणाऱ्या ‘होलत' नदीच्या किनाऱ्यावर भगवान श्री प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकविले जात असे. तेथे इ. स. ११८२ ते १२५१ मध्ये कुब्लईखा नावाचा सम्राट होता. त्याचे गुरू पंडित आनंदध्वज होते. त्यांनी ‘एर्देनियन-सांङग्-सुबाशिदी' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यातील ‘एर्देनि' हे रत्नाचे व ‘सुबाशिदी' हे सुभाषिताचे मंगोलियन भाषारूप आहे. त्याचे सरळ भाषांतर म्हणजे ‘सुभाषित रत्नाविधि' हे होय. त्यावर ‘रिच्छेनपाल्साङगपो' यांची टीका आहे. त्यात रामायणाचा सारांश मिळतो. त्यात असे सांगितले आहे की, लंकाधिपती रावण जनहितापासून विमुख झाल्यामुळे नाशाला प्राप्त झाला. कथेचे सार दर्शविणारा मूळ उतारा असा- ‘ओलान दुर आश्व बोलुग्रासन येरवे खुमुन देमि आलिया नागादुम्बां। ओरव्यु आमुर सांगरक्रुबा इंद्रेन ओम्दागान दूर नेङग उल शिन्युग्युयाई। ओल्ज गुसेल दूर नेङग येसे शिनुग्सेन-उ गेम इमेर। ओरिदुमान्गोस उन निगेन स्वागान लंगा - दूर आलाग्दासान।'
म्हणजे ‘जनतेच्या नेत्यांनी, महापुरुषांनी क्षुल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये. विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्याने व कामवश झाल्याने प्राचीन काळी राक्षसराज रावण लंकेत मारला गेला. अशा प्रकारे ही ‘रामन खागान' म्हणजे ‘राजाराम' यांची कथा हजारो वर्षांपासून मंगोलियन, चिनी, सैबेरिया, रशियन लोकांमध्ये वाचली जाते आहे. सांगितली जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या कथा श्रवणाने शरयू नदीच्या अंतरंगात जशा आनंदाच्या लहरी उसळतात, त्याप्रमाणे ती अनुभूती ‘होल्गा' नदीनेदेखील अनेक शतके घेतली आहे. निदान रशियातील रक्तरंजित क्रांतीमुळे ‘लाल' होईपर्यंत! वरीलप्रमाणे रामायणाचा प्रभाव ‘कांबोडिया' म्हणजे कांबोज इंडोनेशिया या देशांमध्येदेखील आपल्याला आढळून येतो. कंबोडियाची राजधानी ‘नॉम्पेन' आहे. त्याठिकाणी संस्कृत भाषेतील सहस्रावधी शिलालेख सापडले आहेत. येथील विराट सभागृहावरील भिंतीवर इ. स. १२०० मध्ये सम्राट सूर्यवर्मन द्वितीय याच्या कारकीर्दीत रामायण आणि महाभारत यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग चित्रित केले आहेत. त्याचप्रमाणे इंडोनेशियाच्या प्रमुख दोन मंदिरांच्या भिंतीवरही रामायणातील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. इंडोनेशियातील रामायणावर वाल्मीकी रामायणाचा अधिक प्रभाव आहे. त्याचे नाव ‘काकाविन रामायण' असून त्याचा रचयिता योगेश्वर कवी आहे असे म्हणतात. याचा रचनाकाल अकरावे शतक आहे. यांत रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांचे मर्मस्पर्शी वर्णन केले आहे.
रामायणातील तत्त्वज्ञान आग्रहीपणाने मांडले आहे. राम-भरत भेटीच्या प्रसंगात पादुका देताना प्रभू रामचंद्र भरताला उपदेश करताना म्हणतात-
‘‘शील रहयु रक्षन् राग द्वेष हिलङकॅन।
किम्बरु यत हीलनु, शून्याम्बक्त लवन अनव।।
गाँङग हँकार यत हिलन। निन्दा तम् गवयाकॅन।
तं जन्मामुहर बॅक्र। येक प्रश्रय सुमुख।।
म्हणजे, ‘हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग द्वेष सोडून दे. ईष्र्यादि दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्याधिक अहंकारापासून स्वतःला वाचव.निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व करू नकोस. हे भरता, हाच खरा धर्म आहे व हेच खरे सत्य आहे.' या प्रकारचा रामाचा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्य रक्षणात व्यस्त राहिला. ‘भरत सिर तमोल भक्ति मंराक्ष राज्य!'
या प्रकारे आर्य संस्कृतीच्या सर्वपरिचित हिन्दु संस्कृतीच्या ‘कृण्वन्तो विश्वमायेन् ' या विजिगीषू ध्येयवादाचे प्रतिनिधित्व करणारी ही रामायण कथा आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांचे व्यक्तिमत्त्व महर्षी वाल्मीकिंनी रामकथेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीची शाश्वत जीवनमूल्ये मांडलीत.
त्याचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यातूनच हिंदू म्हणजे कोणत्या गुणसमुच्चयाची संस्कृती, समाज आणि व्यक्ती याचा परिचयात्मक मापदंड जगात निर्माण झाला. परस्त्रीला मातेसमान मानणारा, परंपरेसाठी श्रेष्ठ जीवन मूल्यांसाठी प्राणाची बाजी लावणारा, प्रतिज्ञापूर्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा, धर्मरक्षणासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी, दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी हातात शस्त्रधारण करणारा, कुटिलतेने प्राप्त झालेले राज्य न्यायासाठी, सत्यासाठी नाकारणारा, वैभवशाली राज्याचाही एक ‘विश्वस्तङ्क (ट्रस्टी) म्हणून त्याचा ‘उपभोगशून्य स्वामीङ्क या नात्याने सांभाळ करणारा. अशा या सांस्कृतिक जीवनमूल्यांची वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, नैतिक, राजकीय क्षेत्रात ‘प्रतिष्ठापना' करणे, होणे म्हणजे आराध्यदेव असलेल्या श्री प्रभू रामचंद्रांची मूर्तीची ‘प्रतिष्ठापना' होणे होय. त्याशिवाय इतर गोष्टी म्हणजे श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे
‘देव सोडोनी- देवालये पूजिती'
‘बुद्धी दे रघुनायका'।।