देशात एचटीबीटी बियाण्यांना परवानगी द्या

09 Feb 2024 20:22:26
- खासदार भावना गवळी यांची संसदेत मागणी

यवतमाळ, 
महाराष्ट्र, तेलंगण, आन्ध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र ‘बीटी थ्री’च्या बियाण्यांवर बंदी असल्यामुळे शेतकर्‍यांना शेती नुकसानाची ठरत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी देशात एचटीबीटी बियाण्यांना परवानगी देण्याची मागणी खासदार Bhavna Gawli भावना गवळी यांनी संसदेच्या अर्थसंकल्प सत्रात केली.
 

Bhavna savali 
 
बीटी थ्रीला परवानगी देण्याची मागणी अनेक वर्षार्ंपासून केली जात आहे. या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून प्रलंबित आहे. या प्रकरणात लक्ष घालून त्याचा निपटारा करणे, तसेच बीटी थ्रीला परवानगी देणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्‍यांना निसर्गशेती करायची असेल त्यांनी ती करावी. मात्र शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात बीटी बियाण्यांची मागणी असल्यामुळे देशात या बियाण्याला परवानगी देणे आवश्यक असल्याचे खा. गवळी म्हणाल्या.
 
 
शेतकरी सोयाबीनसह अन्य पिके जेव्हा घरी आणतात नेमके त्याचवेळी पिकांचे भाव पडतात. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते, असा प्रकार होऊ नये म्हणून सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली. Bhavna Gawli खा. भावना गवळी यांनी याच एचटीबीटी बियाणे संदर्भात पंतप्रधानांना यापूर्वीच सविस्तर पत्रेही लिहिले आहे, हे उल्लेखनीय.
शकुंतलेचे ब्रॉडगेज करा
यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे अत्यावश्यक आहे. या मार्गासाठी अनेकदा सर्वेक्षण झाले. मात्र या प्रकल्पाला गती मिळाली नाही. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाकरिता 750 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लवकरच या मार्गावर कळंबपर्यंत रेल्वे धावणार आहे. आता शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेत या प्रकल्पाला गती देण्याचीही मागणी यावेळी Bhavna Gawli खा. भावना गवळी यांनी संसदेत केली.
Powered By Sangraha 9.0