महाराष्ट्र, तेलंगण, आन्ध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र ‘बीटी थ्री’च्या बियाण्यांवर बंदी असल्यामुळे शेतकर्यांना शेती नुकसानाची ठरत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या फायद्यासाठी देशात एचटीबीटी बियाण्यांना परवानगी देण्याची मागणी खासदार Bhavna Gawli भावना गवळी यांनी संसदेच्या अर्थसंकल्प सत्रात केली.
बीटी थ्रीला परवानगी देण्याची मागणी अनेक वर्षार्ंपासून केली जात आहे. या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून प्रलंबित आहे. या प्रकरणात लक्ष घालून त्याचा निपटारा करणे, तसेच बीटी थ्रीला परवानगी देणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्यांना निसर्गशेती करायची असेल त्यांनी ती करावी. मात्र शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात बीटी बियाण्यांची मागणी असल्यामुळे देशात या बियाण्याला परवानगी देणे आवश्यक असल्याचे खा. गवळी म्हणाल्या.
शेतकरी सोयाबीनसह अन्य पिके जेव्हा घरी आणतात नेमके त्याचवेळी पिकांचे भाव पडतात. यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते, असा प्रकार होऊ नये म्हणून सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली. Bhavna Gawli खा. भावना गवळी यांनी याच एचटीबीटी बियाणे संदर्भात पंतप्रधानांना यापूर्वीच सविस्तर पत्रेही लिहिले आहे, हे उल्लेखनीय.