मुंबई,
Murder and suicide of Uddhav group देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान हे खळबळजनक पाऊल उचलले. यानंतर नोरोन्हा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या सर्व प्रकारादरम्यान या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
माजी नगरसेवक घोसाळकर यांचा गोळी लागल्याने उत्तर मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिषेकच्या पोटात आणि खांद्यावर गोळी लागल्याचे दिसत आहे. Murder and suicide of Uddhav group घोसाळकर आणि नोरोन्हा यांच्यात परस्पर वैर असल्याचे सांगण्यात आले. अभिषेक हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा होता.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी नोरोन्हा यांची भेट घेतली होती आणि त्यांना त्यांच्या (शिंद्यांच्या) नेतृत्वाखालील शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.