दुचाकी अपघातात दोन गंभीर जखमी

09 Feb 2024 17:40:53
कारंजा लाड, 
bike accident : दोन दुचायांची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना ९ फेब्रुवारीला ११.३० वाजता च्या दरम्यान कारंजा पिंजर मार्गावरील शिवनगर गावाजवळ घडली. पुष्पक राठोड व अशोक पवार अशी जखमींची नावे असून त्यातील एक मंगरूळनाथ येथील तर दुसरा पिंपळगाव येथील रहिवासी आहे.
 
 
bike
 
 
प्राप्त माहितीनुसार यातील एक जण दुचाकी ने कारंजा येथून अकोला येथे जात असताना मार्गातील अपघात स्थळी विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जबरदस्त धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णचालक नितीन मानकर यांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.
Powered By Sangraha 9.0