कोराडी औष्णिक वीज केंद्राने गाठले नवे उच्चांक

01 Mar 2024 20:39:56
-महत्तम वीज निर्मिती

नागपूर,
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये दुसर्‍या क्रमांकाची स्थापित क्षमता असणार्‍या Koradi Thermal Power Station कोराडी औष्णिक वीज केंद्राने झीरो ‘डिसअलॉऊन्स’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी, उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य उपयोग, कार्यक्षमता वाढीसह नवे विविध उच्चांक गाठले आहेत. कोराडी वीज केंद्राने फेब्रुवारी-2024 मध्ये महत्तम मासिक एमईआरसी भारांक 86 टक्के, महत्तम मासिक सीईए भारांक 86.58 टक्के नवा उच्चांक गाठला आहे.
 
 
Koradi
 
660 मेगावॅटचे तीन संच कार्यान्वित झाल्यापासून फेब्रुवारी-2024 मध्ये महत्तम मासिक एमईआरसी भारांक 86.01 टक्के, महत्तम मासिक सीईए भारांक 86.65 टक्के नवा उच्चांक गाठला आहे. संच क्रमांक-8, 660 मेगावॅट कार्यान्वित झाल्यापासून, फेब्रुवारी-2024 मध्ये महत्तम मासिक सीईए भारांक 92.20 टक्के हा नवा उच्चांक गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी.अनबलगन यांनी Koradi Thermal Power Station कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे व चमूचे विशेष कौतुक, अभिनंदन केले आहे. महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाचे नियमित सहकार्य, मार्गदर्शनामुळे, कोराडी चमूच्या परिश्रमाची ही फलश्रुती झाल्याचे विलास मोटघरे म्हणाले.
मागणी वाढली
उन्हाळ्यात वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे संच पूर्ण क्षमतेने वीज उत्पादनास सज्ज राहावेत, यासाठी विजेच्या संचांची देखभाल दुरुस्ती, भांडवली खर्च ही कामे पावसाळ्यात विजेची मागणी कमी राहत असल्याने करण्यात येतात. मार्च सुरू झाला असून दुपारी विजेची मागणी 27 हजारच्या घरात पोहचली आहे. कोळशाच्या पूर्वनियोजनामुळे 19 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. विजेची मागणी, पुरवठा आकडेवारी पाहिल्यास महानिर्मितीच्या एकूण 27 संचांपैकी 26 संचांतून वीज उत्पादन सुरू आहे. 1 मार्चला सकाळी महानिर्मितीचे औष्णिक वीज उत्पादन विक्रमी 8460 मेगावॅट होते. कोळसा, वायू, सौर, जलविद्युत उत्पादन एकूण 9 हजार मेगावॅट इतके होते.
Powered By Sangraha 9.0