‘गुगल फॉर्म’ तक्रार निवारणात शिक्षण विभाग ‘नापास’

01 Mar 2024 19:40:20
- सीईओ मंदार पत्की यांनी घेतली ‘शाळा’

यवतमाळ, 
कर्मचार्‍यांची प्रलंबित कामे वेळेत का काढण्यात आली नाही यासाठी नवे मुख्य कार्यकारी अधिकारी Mandar Patki मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. शुक‘वार, 29 फेब्रुवारी रोजी या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यात शिक्षण विभागाच्या 446 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात उमरखेड व आर्णी पंचायत समितीतील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तर दिली आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांना 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, या वेळेत प्रकरणे निकाली न निघाल्यास संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन थांबविण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले.
 
 
y1March-Z-P-Yavatmal
 
मुख्य कार्यकारी अधिकारी Mandar Patki मंदार पत्की यांनी आढावा घेतला असता आर्णी व उमरखेड पंचायत समिती शिक्षण विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संबंधित कर्मचार्‍यांची कानउघाडणी करून या कर्मचार्‍यांकडून दिलेल्या मुदतीत कामे न झाल्यास वेतन थांबविण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिल्याने गुगल फॉर्म तक्रार निवारणात शिक्षण विभाग ‘नापास’ झाल्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेतंर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांची वैद्यकीय देयके, निवृत्तीवेतन, तसेच इतर कामे वेळेत निघत नाहीत. त्यामुळे सीईओ पत्की यांनी कामाला गती मिळावी या उद्देशाने गुगल फॉर्मवर कर्मचार्‍यांच्या तक्रारी मागविल्या आहेत. या तक्रारींचा सीईओसुद्धा आढावा घेत आहेत.
 
 
जिप सभागृहात शिक्षण विभागाच्या तक्रारींचा आढावा घेतला असता आर्णी व उमरखेड पंस शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांनी तक्रारीवर कर्मचार्‍यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने सीईओ पत्की यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. गुगल फॉर्मच्या पहिल्याच आढावा सभेत कर्मचार्‍यांची शाळा घेण्यात आल्याने कामचुकार कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0