- जिंकले 21 लाखांचे बक्षीस
नेर,
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असावा, शाळा, पुस्तक आणि गृहपाठ या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांमध्ये आलेल्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले. यामध्ये केंद्र, तालुका, जिल्हा आणि विभागातील मोठमोठ्या नामवंत शाळांना मागे टाकून दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने अमरावती विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala : राज्यस्तर मूल्यांकन समितीकडून तपासणी करण्याकरिता शिक्षण संचालक शरद गोसावी, सहसंचालक जी. मुकुंद, हिंगोली शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, परभणी डाएट अधिव्याख्याता प्रा. डॉ. प्रल्हाद खुणे, यवतमाळ प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, शालेय पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक, गट समन्वयक विजय धुरट, साधन व्यक्ती गणेश मेंढे व श्रीकांत जोल्हे उपस्थित होते.
यावेळी करिअर मार्गदर्शन, शालेय मंत्रिमंडळ, आर्थिक साक्षरता, एनसीसी, विद्यार्थी बचत बँक, स्वच्छता मॉनिटर, परसबाग, जैविक अन्नप्रकि‘या, वाचन कट्टा, मधुमेह व लठ्ठपणा समुपदेशन, शिक्षक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण, व्यसनमुती व प्लॅस्टिकमुक्ती मार्गदर्शन अशा राबवलेल्या एकूण तीस उपक्रमांची तपासणी करण्यात आली. यासह शिक्षकांचे पाठ निरीक्षणसुद्धा करण्यात आले. या अभियानासाठी पालक, माजी विद्यार्थी, व्यवस्थापन मंडळ व सामाजिक संस्था यांची महत्त्वाची भूमिका होती. यासाठी प्राचार्य गजानन उईके यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही परिश्रम घेतले. या उत्तुंग भरारीसाठी दि इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.