शुभम निनावे भाजयुमो तालुकाध्यक्ष पदी नियुक्त

    दिनांक :01-Mar-2024
Total Views |
आर्णी, 
Shubham Ninave भारतीय जनता पार्टी आर्णी तालुका अध्यक्ष किसन राठोड यांनी नुकतेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी शुभम निनावे यांची नियुक्ती केली आहे. हा निर्णय लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त युवकांना व नव मतदारांना पार्टीला जोडण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे. नियुक्तीनंतर शुभम निनावे यांनी तालुकाध्यक्ष किसन राठोड, अण्णासाहेब पारवेकर, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार डॉ. संदीप धुर्वे व सरचिटणीस रितेश परचाके यांचे आभार मानले आहे.
 
Shubham Ninave