श्री संत रुपनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवाची रथोत्सवाने सांगता

10 Mar 2024 20:32:28
दहीहांडा,
 
Akola-Rupnath Maharaj येथील ग्रामदैवत श्री संत रुपनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवाची रथोत्सवाने रविवार, 10 मार्च रोजी सांगता झाली. यात्रा महोत्सवाला बुधवार 28 फेब्रुवारी रोजी तीर्थ स्थापनेने सुरवात झाली होती. Akola-Rupnath Maharaj यात्रा महोत्सवा निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले होते. Akola-Rupnath Maharaj यात प्रामुख्याने खंजिरी भजन स्पर्धा, कथा व्यास देवी वर्षा किशोरी यांचे शिव महापुराण प्रवचन, ह भ प सोपान महाराज लोखंडे , ह भ प प्रल्हाद महाराज ढोले, ह भ प ज्ञानेश्वर महाराज पातोंड, ह भ प रामकृष्ण महाराज आंबुसकर, ह भ प अच्युत महाराज बोरुडे , ह भ प संदीप महाराज लांजुळकर यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला.Akola-Rupnath Maharaj
 
 
 
Akola-Rupnath Maharaj
 
 
ग्राम गीतेवर आधारित समाज प्रबोधनाचा संदीपपाल महाराज यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम तर मोगरा फुलला हा अनिरुद्ध देशपांडे, प्रा. डॉ. प्राजक्ता हसबनीस यांचा भक्ती गीत , भावगीत गायनाचा कार्यक्रम झाला. रविवार, 10 मार्चला रोजी चंद्रशेखर चतारे , पद्माकर मोरे, सार्थक आंबुसकर, निनाद चतारे यांच्या भाव- भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. तर पहाटे श्रींची रथ मिरवणूक काढण्यात आली. Akola-Rupnath Maharaj दुपारी यात्रा मैदानात दहीहंडी गोपालकाला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रथोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होती.
Powered By Sangraha 9.0