प्रकाश आंबेडकर मविआच्या उमेदवारीपासून ‘वंचित’ का?

11 Mar 2024 20:18:23
अकोला,
 
Akola-Prakash Ambedkar-MVA लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली असताना राज्यातील महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोंगडे अजून कायमच असून या आघाडीने अजूनपर्यंत वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाची व सूचनांची दखलच घेतली नाही असे दिसून आले आहे. Akola-Prakash Ambedkar-MVA त्यामुळे उमेदवारी पासून महाआघाडीने त्यांना ‘वंचित’ ठेवले असल्याची टीका होत असून वंचित तर्फे शहरात विविध ठिकाणी फलके लावण्यात आली असून महाआघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारले आहेत. Akola-Prakash Ambedkar-MVA वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार असतानाही या सर्व पक्षातील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.त्या संबंधाने अकोल्यात वंचितकडून फलकबाजी केली जात आहे. Akola-Prakash Ambedkar-MVA अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला काही प्रश्न करणारे फलक संपूर्ण शहरात लागले आहेत. या माध्यमातून महाविकास आघाडीला बेजार केले जात आहे. या फलकाची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.
 
 

Akola-Prakash Ambedkar-MVA 
 
 
2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंतच्या महाविकास आघाडीच्या बैठकांपासून वंचितला दूर का ठेवले?. 30 जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीच्या बाहेर का बसवले? असे अनेक प्रश्न या फलकाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला विचारण्यात आले आहेत. Akola-Prakash Ambedkar-MVA अकोला शहरातील नेहरू पार्क, अशोकवाटिका, कृषीनगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी या आशयाचे फलक लावले गेले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही घोषित होऊ शकतात. मात्र अजूनही महाविकास आघाडीचा जागावाटपा संदर्भातील तिढा सुटला नाही. त्यातच आता या फलकाच्या माध्यमातून मविआवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. Akola-Prakash Ambedkar-MVA महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, तर 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवले? याचे उत्तर द्या. वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही ? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे? असे प्रश्न या फलकातून विचारण्यात आले आहेत.Akola-Prakash Ambedkar-MVA
 
 
 
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हरणार्‍या 2 जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना गेल्या 15 ते 20 वर्षांपासून जिंकता आलेल्या नाहीत. या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. Akola-Prakash Ambedkar-MVA या फलकबाजीतून हे दिसून येत आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केलेली नाही व हा प्रश्न त्यांनी टांगून ठेवला आहे. ही बाब शेवटी खरी ठरल्यास अकोला लोकसभा मतदार संघात परंपरे प्रमाणे तिहेरी लढत होईल. महाविकास आघाडीने वंचितशी आघाडी केली तर अकोला लोकसभा मतदार संघ अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांसाठी सोडावा लागणार आहे. Akola-Prakash Ambedkar-MVA तसे झाल्यास आधीच या मतदार संघातून काँग्रेसचे अस्तित्व संपल्या सारखे आहे ते आणखी पूर्णत: संपण्याच्या दिशेने जाणार आहे. ही बाब काँग्रेसला मान्य नसल्यास या मतदार संघात नेहमी प्रमाणे तिहेरी लढत होण्याची शक्यता जास्त राहील.
Powered By Sangraha 9.0