काय आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक ?

11 Mar 2024 18:59:29
नवी दिल्ली, 
 
what is CAA-India नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ आजपासून देशभरात लागू झाला आहे. याआधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अनेकदा वाद झाले आहेत. what is CAA-India त्याचवेळी, काही काळापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले होते की, सीएए हा देशाचा कायदा आहे आणि तो सर्व परिस्थितीत लागू केला जाईल. what is CAA-India भारतीय जनता पार्टीच्या पूर्वघोषणेनुसार, नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ देशभरात लागू करण्यात येत असल्याचा अधिनियम थोड्या वेळापूर्वी सरकारच्या वतीने जरी करण्यात आला आहे. what is CAA-India नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ विषयी काही महत्वपूर्ण बाबी समजून घेऊ या !
 लगेच वाचा ... देशभरात सीएए कायदा लागू !
 
 
what is CAA-India
 
 
नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे ?what is CAA-India
CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ ने भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन शेजारी राष्ट्रांमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला आहे. या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो. या कायद्यामुळे भारतातील मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या आणि समुदायाच्या नागरिकांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही.
 
 
हा कायदा कधी मंजूर झाला ?what is CAA-India
११ डिसेंबर २०१९ रोजी नागरिकत्व सुधारणा विधेयक भारतीय संसदेत मंजूर करण्यात आलं.  त्याच्या बाजूने १२५ आणि विरोधात १०५ मते पडली. या विधेयकाला राष्ट्रपतींनी १२ डिसेंबरला मंजुरीही दिली होती. मोदी सरकार आणि त्यांचे समर्थक याला ऐतिहासिक पाऊल म्हणत असतानाच विरोधक आणि मुस्लिम संघटनांकडून याला कडाडून विरोध केला जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचे पूर्ण रूप म्हणजेच हे नागरिकत्व सुधारणा कायदा आहे. what is CAA-India संसदेत मंजूर होण्यापूर्वी हे CAB (नागरिकत्व सुधारणा विधेयक) होते. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक नागरिकत्व सुधारणा कायदा बनला आहे.
 
 
नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत वाद का ?
नागरिकत्व (सुधारणा) कायदा अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील (हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी) बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करतो. यावर काही टीकाकारांचे म्हणणे आहे की, ही तरतूद भेदभाव करणारी आहे, कारण त्यात मुस्लिमांचा समावेश नाही. त्यामुळे ते वादात सापडले आहे.what is CAA-India
 
 
नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये मुस्लिमांचा समावेश का नाही ?
गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत संसदेत सांगितले होते की, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लिम देश आहेत. तिथे बहुसंख्य मुस्लिमांवर धर्माच्या नावावर अत्याचार होत नाहीत, तर या देशांमध्ये हिंदूंसह इतर समाजाच्या लोकांवर धर्माच्या आधारे अत्याचार केले जातात. what is CAA-India त्यामुळे या देशांतील मुस्लिमांचा नागरिकत्व कायद्यात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, त्यानंतरही तो नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो, त्यावर सरकार विचार करून निर्णय घेईल.
 
 
नागरिकत्व कोणाला मिळणार ?
नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू झाल्यानंतर नागरिकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारकडे असेल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी धर्माच्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात येऊन स्थायिक झालेल्यांनाच नागरिकत्व मिळेल. what is CAA-India या कायद्यानुसार, ते लोक बेकायदेशीर स्थलांतरित मानले गेले आहेत, जे वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय (पासपोर्ट आणि व्हिसा) भारतात आले आहेत किंवा वैध कागदपत्रांसह भारतात आले आहेत, परंतु निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ येथे राहिले आहेत.
 
 
नागरिकत्वासाठी अर्ज कसा करावा ?what is CAA-India
नागरिकत्व मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. याबाबत ऑनलाइन पोर्टलही तयार करण्यात आले आहे. नागरिकत्व मिळविण्यासाठी, अर्जदारांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष सूचित करावे लागेल. अर्जदाराकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. नागरिकत्वाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे ऑनलाइन हस्तांतरित केली जातील. पात्र विस्थापितांना केवळ ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर गृह मंत्रालय अर्जाची तपासणी करेल आणि अर्जदाराला नागरिकत्व दिले जाईल.
 
Powered By Sangraha 9.0