आरटीओ कार्यालयापुढेच रेतीचे वाहन पकडले

    दिनांक :17-Mar-2024
Total Views |
- यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई

यवतमाळ, 
शहरातील काही कुख्यात व राजकीय पक्षांचे बुरखे पांघरणार्‍या अनेकांनी रेती तस्करीचा गोरखधंदा चालविला आहे. स्वतःला भाई समजणार्‍या अनेकांनी या व्यवसायात जम बसविला आहे. दरम्यान यवतमाळात चक्क आरटीओ कार्यालयासमोर Reti Taskari रेती तस्करीचे वाहन शहर पोलिसांनी पकडून 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंकुश फेंडर असे तक्रारदार पोलिसाचे नाव आहे. तर शेख जमील शेख जमाल व अन्य एक अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
 
Reti
 
Reti Taskari : एमएच27 एक्स3700 क्रमांकाच्या 5 लाख रुपये किंमतीच्या वाहनामध्ये 21 हजार रुपये किंमतीची 4 ब्रास रेती विनापरवाना चोरून नेताना या इसमांना पकडले. रेतीने भरलेले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवण्याच्या आरोपावरून पोलिसांनी रेतीसह वाहन असा 5.21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भादंवि कलम 279, 379, 34 व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस विभागातही रेतीचा शिरकाव
पोलिस विभागातीलही काही कर्मचारी अप्रत्यक्षपणे रेती व्यवसायात उतरले असून, त्यांनी आपल्या नातेवाईकांचे वाहने रेतीवर लावले आहे. या पोलिस कर्मचार्‍यांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.