मानोरा,
Pani Adwa Pani Jirwa दिवसेंदिवस पावसाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध पाणी वाहून नष्ट न होता पाण्याला जमिनीमध्ये मुरवून पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी मृदा व जलसंधारण विभागाकडून ऊपलब्ध कोट्यवधी रुपयाच्या निधीला कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी कर्मचार्यांच्या संगणमतीने पाय फुटून ही योजना कागदोपत्री राबविली जात असल्याचे आसोला येथील नागरिकाने केलेल्या तक्रारीवरून पुढे येत आहे.
आसोला खुर्द परिसरामध्ये मृदा व जलसंधारण विभागाद्वारा येथील दोन शेतकर्यांच्या शेतशिवारालगत बांधण्यात आलेला बंधारा अतिशय निकृष्ट बांधकाम साहित्य वापरून बांधण्यात आल्याची तक्रार स्थानिक नागरिक युवराज रंगराव राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करून चौकशीची मागणी केली आहे. आसोला खुर्द येथील कोंडदरी धरणातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहावर बांधण्यात आलेला बंधारा मृदा व जलसंधारण विभागाच्या मानाकांचे खुल्ले उल्लंघन करून बांधण्यात आल्याने मृदा व जलसंधारण विभागाचा जलसंधारणाचा हेतू अजिबात सफल होणार नसल्याचे निवेदनकर्त्यांनी नमूद केले आहे.Pani Adwa Pani Jirwa बंधारा निर्मिती दरम्यान विभागाच्या कुठल्याही जबाबदार अधिकार्याने कधीच भेट ना दिल्यामुळे भ्रष्ट कामाला मुकसंमती अधिकारी कर्मचार्यांची असल्याचे लेखी निवेदनात नमूद केले आहे. बंधारा बांधकाम करणार्या भ्रष्ट कंत्राटदाराला संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी राजाश्रय देऊन शासकीय निधीचा अपव्यव करून पाण्याच्या नासाडीला उपरोक्त अधिकारी व कंत्राटदार हे जबाबदार राहणार असल्याने उपरोक्तांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.