विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळणार मोफत

सरपंच-ग्रामसेवक यांच्याकडे पुस्तके सुपुर्द

    दिनांक :19-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
competitive exam books जिल्हा नियोजन समिती यवतमाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा तथा सरळ सेवा भरती परीक्षांचे पुस्तके उमरी तेंडोळी, दाभडी बोरगाव, विठोली येथे मोफत वाटप करण्यात आली.
 
 
competitive exam books
 
ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा अधिकारी व्हावेत शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसांठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके संबंधीत ग्रामपंचायत यांना सुपूर्द करण्यात आली. ही पुस्तके विद्यार्थ्यांना गावातच ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होतील व ते घरी राहून अभ्यास करू शकतील. त्याच प्रमाणे विद्यार्थी स्कॅनरच्या माध्यमातून आभासी पद्धतीने पुणे येथील नामवंत क्लासचे ज्ञान घेऊ शकतील. competitive exam books या प्रसंगी डॉ. विष्णू उकंडे यांनी या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्की अधिकारी बनतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राजुदास जाधव, राजेंद्र जाधव, गटविकास अधिकारी सुधाकर पंडे, माकोडे, अश्विनी देशमुख, तेंडोळीचे सरपंच सपना रविशंकर राठोड, उमरीचे सरपंच राजकमल उमरे, विठोलीचे सरपंच वासुदेव चव्हाण, दाभडीच्या सरपंच वानखेडे, उपसरपंच बाळू राठोड, मेश्राम, गणेश राठोड, अनिल पवार, निलेश चव्हाण, ग्रामसेवक ठेंगेकर, नामदेववार, अशोक राठोड, प्रेरणा योजना दुत पूजा निंबाळकर, अंबिका वानखेडे, प्रेम जाधव, विलास राठोड, खुशाल राठोड, संजय पवार उपस्थित होते.