नागपूर,
Pratap Nagar High Schoolप्रताप नगर शिक्षण संस्था उपाध्यक्ष शंकर पहाडे यांचे अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून भारतीय स्री शक्ती अध्यक्षा निलम पर्वते, सचिव मेघा कोरडे, प्रताप नगर शिक्षण संस्था सचिव अनुपमा नाफडे व शाळा मुख्याध्यापिका मंजुश्री टिल्लू मंचावर हजर होत्या.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटनकरण्यात आले होते.मंचावरील सर्वांचे गुलाबपुष्प देऊन व प्रमुख वक्ता निलम पर्वते यांना एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. Pratap Nagar High Schoolनिलम पर्वते यांनी भारतीय स्री शक्ती संघटनेच्या कार्याबद्दल माहिती देऊन या संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या कन्या शिक्षण निधी योजना व ग्रामीण स्री शिक्षण योजनेची माहिती दिली. सोबतच जागतिक महिला दिनाचे महत्त्व सुध्दा विषद केले. अध्यक्षीय भाषणात शंकर पहाडे यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी व महिलांनी सक्षम होण्यासाठी काय केले पाहिजे ते सांगितले. शाळेतील विद्यार्थिनी यांनी आतापासूनच सक्षम होण्यासाठी काय करावे हेसुद्धा सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मानस गोडबोले यांनी केले. प्रास्ताविक शाळेची विद्यार्थीनी गितीका डुले हीने केले. आभार शिक्षक तेजराम बांगडकर यांनी मानलेत.
सौजन्य: शंकर पहाडे, संपर्क मित्र