ब्राह्मणांनी आत्मकल्याण साधत ब्राह्मतेज प्राप्त करावे

    दिनांक :26-Mar-2024
Total Views |
- निलेश केदार शास्त्री यांचे उद्बोधन
- समर्थ ब्राह्मण मंडळाचा ‘ब्रह्मगौरव’ पुरस्कार समारंभ

यवतमाळ, 
ब्राह्मण ज्ञातीतील सर्वांनी कर्तृत्त्वाने आपापल्या कर्मक्षेत्रात विविध उच्चपदांवर अवश्य जावे. मात्र वैयक्तिक जीवनात नित्य गायत्री उपासना, संध्यावंदन यांसह आपली उपासना करून आत्मकल्याण साधत अपेक्षित ब्राह्मतेज प्राप्त करावे. त्यात राष्ट्राचेही हित आहे, असे प्रतिपादन माहूरच्या वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य Nilesh Kedar Shastri निलेश केदार शास्त्री यांनी केले. शनिवार, 23 मार्च रोजी यवतमाळच्या श्रीसमर्थ ब्राह्मण मंडळाच्या ‘ब्रह्मगौरव’ पुरस्कार समारंभाचे मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अच्युत देशपांडे होते.
 
 
y26March-Brahman
 
दीपप्रज्वलन आणि भगवान परशुराम, समर्थ रामदासांच्या प्रतिमापूजनानंतर समर्थ ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष राजेश गढीकर यांनी प्रास्ताविकातून ‘ब्रह्मगौरव’ पुरस्कार देण्यामागील मंडळाची भूमिका सांगताना परशुरामांचे क्षात्रतेज आणि समर्थ रामदासांची बलोपासना यांचा आवर्जून उल्लेख केला. यावर्षीच्या ‘ब्रह्मगौरव’ पुरस्काराचे मानकरी अरविंद डगावकर, धनंजय तांबेकर तसेच लष्करातील लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे (मरणोत्तर) यांचा अतिथींच्या हस्ते मानाची पगडी, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान केला गेला. स्व. रवींद्र थोडगे यांच्या पत्नी मंजूषा यांनी सन्मान स्वीकारला.
 
 
Nilesh Kedar Shastri : सहकार क्षेत्रात अनेक उद्योजक घडविणारे अरविंद डगावकर यांनी भाषणातून ब्राह्मणांनी नियमितपणे एकत्र येत आपले अनुबंध दृढ करावे, असे आवाहन केले. अर्थक्षेत्रातील तज्ञ व सर्वांना मदत करणारे धनंजय तांबेकर यांनी समर्थ मंडळाने गरजवंतांना वेगवेगळ्या प्रकारे साह्य करावे, ही अपेक्षा व्यक्त केली. मंजूषा थोडगे यांनी यावेळी, अधिकाधिक युवक आर्मीमध्ये यावेत यासाठी ‘समर्थ’ने विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन केले. ले. ज. रवींद्र यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात पाचसहा वेळा पुरस्कार स्वीकारताना झालेला आनंद मला याहीवेळी झाला असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
ब्रह्मगौरव पुरस्कार देताना समर्थ मंडळाचे अध्यक्ष राजेश गढीकर यांच्यासह उपाध्यक्ष अभिजित दाभाडकर, सचिव निलेश टिकले व कार्यकारिणी सदस्य विवेक कोरटकर व्यासपीठावर होते. ब्रह्मगौरव पुरस्कारार्थ्यांच्या मानपत्रांचे वाचन डॉ. विवेक विश्वरूपे, स्वाती सहस्रबुद्धे व अतुल गंजीवाले यांनी केले. याच कार्यक्रमात पोलिस दलातील कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकप्राप्त सुशील जोशी, सेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात पुरस्कार मिळविणारे युवा संगणक अभियंता वरद विश्वरूपे यांना ‘समर्थ सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
 
 
Nilesh Kedar Shastri : अध्यक्ष प्राचार्य डॉ. अच्युत देशपांडे यांनी समाजरूपी ‘पिरॅमिड’चा शीर्षबिंदू असणार्‍या ब्राह्मणाने आपले पावित्र्य जपावे व दिवसातून किमान एकदा संध्याकर्म करावे, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. राजश्री धर्माधिकारी यांनी केले. भक्ती जोशी यांनी पसायदान म्हटले. यावेळी झालेल्या सुगम संगीत कार्यक्रमामध्ये प्रसन्न देशपांडे, हेमाक्षी सारोळकर, अवधूत डाऊ व वेदांग कोरटकर यांनी गाणी गायिली. दत्तात्रय देशपांडे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात सौरभ देवधर यांनी तबला साथ केली.