नागपूर,
Anchal Goyal नागपूर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आँचल गोयल यांनी सीताबर्डी बाजारपेठेला भेट दिली. याप्रसंगी सीताबर्डी मित्र मंडळाचे संयोजक दिनेश गावंडे यांनी आँचल गोयल यांचे स्वागत केले.
सीताबर्डी नेताजी मार्केट येथील फुल व्यापारी व नागरिकांच्या विविध प्रकारच्या, प्रामुख्याने महिलांसाठी शौचालय, मार्केटमध्ये स्वच्छता, पार्किंग समस्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास ट्रॅफिक जाम या समस्या बाबत अवगत करून दिले. Anchal Goyalआँचल गोयल यांनी समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.सीताबर्डी मर्चंट असोसिएशन, मोबाईल मार्केट , तेलीपुरा मार्केट,असोसिएशन चे गुड्डू अग्रवाल कैलास छाब्रिया विनोद माहुले आदि उपस्थित होते.
सौजन्य:अमोल तपासे,संपर्क मित्र