राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

30 Mar 2024 21:43:05
- काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
 
पुणे, 
Unseasonal rain : राज्यात दोन दिवस वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, अहमदनगर, बीड, जळगाव, नंदुरबार, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच विदर्भातील उर्वरित काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी पडणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक तापमानात नोंदविण्यात आले आहे. मात्र, आता राज्यात काही ठिकाणी पावसाची आणि तीव‘ उन्हाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 
Unseasonal rain ele
 
Unseasonal rain : हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबाची रेषा किंवा वार्‍याची खंडितता उत्तर तामिळनाडू व नैर्ऋत्य मध्यप्रदेश आणि लगतच्या भागातून कर्नाटक व मराठवाड्यावरून जात आहे, त्यामुळे पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची, त्यानंतर राज्याच्या संपूर्ण भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0