खलिस्तानी अतिरेक्याची 17 कोटींची संपत्ती जप्त

31 Mar 2024 21:52:32
नवी दिल्ली, 
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य व Khalistani militants खलिस्तानी अतिरेकी हरयाणा येथील सुरेंद्र ऊर्फ चिकूच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली 17.82 कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत बँक खात्यातील रक्कम, सोन्याचे दागिने व चंदीगड, नारनौल, जयपूर येथील भूखंडाचा समावेश आहे. बेकायदेशीर सावकारी प्रकरणाशी संबंधित ही कारवाई असल्याचे ईडी अधिकार्‍याने सांगितले आहे.
 

ed 
 
Khalistani militants : अतिरेकी चिकूवर अनेक गुन्हे दाखल असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीसह अतिरेकी संघटना खलिस्तानसाठी काम करतो. बेकायदेशीर दारूची विक्री, व्यावसायिकांकडून वसुली करून त्याने संपत्ती खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले होते. ईडीने त्याच्या 60 बँक खात्याची तपासणी केली असता त्यात कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्याने याच खात्यातून खलिस्तान्यांना पैसे पाठविल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. सध्या तो तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
Powered By Sangraha 9.0