आजपासून नांदेडमध्ये विमान सेवेला प्रारंभ

31 Mar 2024 10:17:43
नांदेड, 
flight service in Nanded नांदेड विमानतळावर 31 मार्चपासून नांदेड - बंगळुरू, नांदेड - दिल्ली - जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड - हैदराबाद आणि नांदेड -अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. स्टार एअरलाइन्सची ही विमानसेवा नांदेडसह परभणी,  हिंगोली,  लातूर बीड,  धाराशिव आदी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नांदेड आता देशभरातील प्रमुख शहराशी जोडले जाणार आहे.
 
 
flight service in Nanded
 
जालंदर - दिल्लीमार्गे रविवारी पहिले विमान दुपारी 4:15 मिनिटांनी नांदेडला पोहोचणार आहे. या विमानाने पोहोचणाऱ्या प्रवाशांचे नांदेड येथे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत केले जाईल. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. flight service in Nanded 2017 मध्ये उडान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा काही दिवसात बंद झाली होती. आता स्टार एअरलाइन्सच्या या विमानसेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0