वेध
- नीलेश जोशी
popcorn brain ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर ।।'
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी माणसाच्या मनाचे वर्णन केलेल्या कवितेतील या ओळी वृत्तपत्रात उमटलेल्या एका बातमीमुळे आपसूक आठवल्या. popcorn brain सद्य:स्थितीत समाज माध्यम हा सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरला जाणारा प्रकार. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसह विविध प्रकारची समाज माध्यमे केवळ तरुणांचीच नव्हे तर आबालवृद्धांच्यासुद्धा सरावाची, आवडीची झाली आहे. पण त्यामुळे मनाची एकाग्रता नष्ट करणारी ‘पॉपकॉर्न ब्रेन' ही नवीन समस्या उभी ठाकली आहे. popcorn brain आपण जर एखाद्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नसू तर हे ‘पॉपकॉर्न ब्रेन' नावाच्या मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. ‘पॉपकॉर्न ब्रेन' म्हणजे नेमके आहे तरी काय? popcorn brain तर, समाज माध्यमांचा सततच्या वापरामुळे एकाग्रतेवर होणारा परिणाम. जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहण्याची सवय ! त्यातही एकाच वेळी विविध समाज माध्यमांचा उपयोग करून तेथे असलेले रिल्स, व्हिडीओ सतत पाहणे आणि त्यामुळे मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ! popcorn brain या परिणामांमुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
popcorn brain एवढेच नव्हे, तर नवीन बाबी आत्मसात करण्यासह स्मरणशक्तीवर परिणाम होतो. समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे मानसिक आरोग्याच्या समस्येत भर पडली आहे. ‘सोशल मीडिया' अर्थात समाज माध्यम ही तशी सकारात्मक संकल्पना. समाज माध्यमांवरील विविध माध्यमांचा वापर अत्यंत उपयोगी आहे. माहितीची देवाण-घेवाण ही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुटकीसरशी होते. popcorn brain सोशल मीडिया जगातील ६० टक्के लोकसंख्येच्या नियमित सरावाचा, सवयीचा भाग बनला आहे. एका सर्वेक्षणातील माहितीनुसार जगभरात तब्बल ५.१९ अब्ज नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात. पूर्व आणि मध्य आफ्रिकेत ११ पैकी १ जण सोशल मीडियाचा वापर करतो. तर, हे प्रमाण भारतात ३ पैकी १ असे आहे. केवळ वापरकत्र्यांचेच प्रमाण नव्हे तर सोशल मीडियावर दिवसातला किती तास घालविण्यात येतो याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली. popcorn brain त्यात सरासरी २ तास २६ मिनिटे सोशल मीडियावर घालविण्यात येतात. पण येथेही देशनिहाय फरक असल्याचे दिसून येते. उदा. ब्राझील येथील वापरकर्ता ३ तास ४९ मिनिटे सोशल मीडियावर घालवितो. हेच प्रमाण जपानमध्ये १ तासांपेक्षाही कमी आहे तर भारतातील वापरकर्ता सरासरी ४ तास सोशल मीडियावर घालवत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. popcorn brain जगात सोशल मीडिया वापरकर्ता विविध प्लॅटफॉर्मचा वापर करतो. त्यात व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि आता ट्विटर ही सर्वाधिक वापरली जाणारी अॅप्स आहेत.
या अॅपच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या चुटकीसरशी सोडविल्या गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातून गरजूंना मदत असो किंवा दुःखी असणाऱ्याला दिलासा. एकीकडे ही सकारात्मक बाजू असतानाच दुसरीकडे मात्र समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे अनेक समस्या समोर येत आहेत. popcorn brain या समस्यांमध्ये मुख्यतः अविवेकी वापरातून उद्भणाऱ्या मानसिक समस्या चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. त्यातच आता ‘पॉपकॉर्न ब्रेन' या समस्येची भर पडली आहे. मनाच्या एकाग्रतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी एकाच वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवण्याची सवय वाढवावी, ज्या डिजिटल उपकरणांद्वारे समाज माध्यमांचा वापर केला जातो ती उपकरणे शक्य तितक्या दूर ठेवावी, वाचन आणि व्यायामासाठी वेळ द्यावा या उपायांसह रोज १० मिनिटे ध्यानधारणा करावी असे सुचविण्यात आले आहे. popcorn brain खरं म्हणजे ध्यानधारणा म्हणजेच ‘मेडिटेशन' हे आमच्या देशात हजारो वर्षांपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाते. मनाच्या स्वास्थ्याकरिता आवश्यक असणारी ही बाब आता या निमित्ताने पुन्हा आवश्यक असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविक भौतिक प्रगती साधत असतानाच आम्हाला मिळालेला सांस्कृतिक वारसा, परंपरा, जीवन जगण्याच्या पद्धती जर जपल्या तर अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत. popcorn brain असे असले तरी ‘पॉपकॉर्न ब्रेन'मुळे कुठल्याही बाबीचा अतिरेकी वापर घातक असतो हेच दिसून येते. याबाबत आता सतर्क होऊन त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
९४२२८६२४८४