अन्...असदुद्दीन ओवेसी पोहचले मुख्तार अन्सारीच्या घरी!

01 Apr 2024 09:25:56
गाझीपूर,
Asaduddin Owaisi एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी रात्री उशिरा मोहम्मदाबादमधील माफिया मुख्तार अन्सारीच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी मुख्तारच्या कुटुंबीयांची भेट घेतली. असदुद्दीन ओवेसी रात्री 11.50 च्या सुमारास मुख्तार यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुख्तार यांचा मुलगा उमर अन्सारी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ओमरसोबत टेबलावर बसून जेवण केले. ओवेसी यांनी मुख्तार यांचा मोठा भाऊ अफजल अन्सारी यांचीही भेट घेतली. यावेळी AIMIM UP चे अध्यक्ष शौकत अली आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
 
muktar
यावेळी मीडियाला ओवेसी यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. आमदार मन्नू अन्सारी यांनी मीडियाला ओवेसीपासून दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि मीडियाला तिथेच थांबवले. Asaduddin Owaisi दुसरीकडे, बातमी मिळताच घटनास्थळी समर्थकांची गर्दी जमली, त्यानंतर पोलिसांनी पुन्हा गेटवर बॅरिकेड लावले. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनाही बॅरिकेडिंगच्या बाहेर राहण्यास सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0