पंतप्रधान मोदी उद्यापासून भाजपाच्या प्रचाराचा करणार शुभारंभ

01 Apr 2024 11:57:13
डेहराडून, 
Prime Minister Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 एप्रिल रोजी उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथे जाहीर सभेला संबोधित करून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत.
 
Prime Minister Modi
 
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर   उत्तराखंडमधील लोकसभेच्या पाच जागांवर सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पाचही जागा 2014 पासून भाजपाच्या ताब्यात होत्या. भाजपाच्या उत्तराखंड युनिटचे मीडिया प्रभारी मनवीर चौहान यांनी सांगितले की, प्रदेश पक्षाचे सरचिटणीस खिलेंद्र चौधरी आणि कॅबिनेट मंत्री सौरभ बहुगुणा यांना 2 एप्रिल रोजी रुद्रपूर येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी समन्वयक बनवण्यात आले आहे. Prime Minister Modi मीडिया प्रभारींनी सांगितले की 3 एप्रिल रोजी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा डेहराडूनच्या पिथौरागढ आणि विकासनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील आणि त्यानंतर रोड शो करतील. नड्डा 4 एप्रिलला हरिद्वारमध्ये संत समाजासोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  पंतप्रधान जे काही करत आहेत, ते बरोबर नाही- केजरीवाल
Powered By Sangraha 9.0