गोंदिया,
Bonus-Farmers-Gondia शासनाने शेतकर्यांना सानुग्रह अनुदान म्हणून दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर केला होता. जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात 233.71 कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले आहेत. Bonus-Farmers-Gondia गत काही वर्षापासून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अस्मानी व सुलताना संकटांना सामोरे जात आहे. त्यातच लागवड, खते, बियाणे, मजुरी, मशागत खर्च वाढल्याने धान शेती परवडण्यासारखी राहिली नसल्याची ओरड शेतकरी करताहेत. उत्पादन खर्चानुसार धानाला हमी दरही अल्प असल्याचे शेतकरी सांगताहेत.Bonus-Farmers-Gondia
केंद्र सरकारची आधारभूत किमत योजना आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यात गैर आदिवासी भागात जिल्हा पणन कार्यालयाच्या उप अभिकर्ता संस्थांच्या माध्यमांतून शासकीय हमी दराने धान खरेदी केली जाते. Bonus-Farmers-Gondia गत काही वर्षापासून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. धान उत्पादकांना आर्थिक बळ देण्यासाठी राजकीय पक्ष, पुढारी, सेवाभावी संस्था, शेतकरी यांनी शानाकडे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. ही मागणी शासनाने मान्य करीत 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 20 हजार रुपये बोनस देण्याचे निश्चित केले.Bonus-Farmers-Gondia
26 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजुर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त योजनेत नोंदणीकृत शेतकर्यांना (नोंदणीकृत शेतकर्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे (दोन हेक्टरच्या मयदित) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता दिली. त्यानुसार जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून 239 कोटी 33 लाख 56 हजार 780 रुपये प्राप्त झाले. Bonus-Farmers-Gondia 8 एप्रिलपर्यंत सुमारे 1 लाख 19 हजार 751 लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात 233 कोटी 70 लाख 98 हजार 280 रुपये वर्ग करण्यात आले. उर्वरीत 3080 लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात 56258500 रुपये वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगीतले. Bonus-Farmers-Gondia