उबाठा सेनेचे दोन नेते भिडले

12 Apr 2024 20:40:41
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Ubatha Sena leaders clashed : नवीवस्ती बडनेरा येथील झिरी दत्त मंदिराच्या सभागृहात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत उबाठा शिवसेनेचे दोन प्रमुख नेते आपसात भिडले. या घटनेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.
 
SJFDKLF
 
 
 
उबाठा सेनेचे बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने यांनी सदर बैठक आयोजित केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे बैठकीसाठी पोहचले. सभागृहात केवळ 15 ते 20 लोक होते. बडनेरासारख्या भागात नागरिकांची साधी गर्दी जमवता आली नाही, असा संताप व्यक्त करून सुनील खराटे यांनी ज्ञानेश्वर धाने यांना सुनावले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रकरण शांत केले असले तरी धुसफुस सुरूच आहे.
 
 
बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी ज्ञानेश्वर धाने पाटील आणि जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यात स्पर्धा आहे. बैठकीच्या निमित्त्याने ती उफाळून आली. शिवसैनिकांमध्ये या स्पर्धेची नेहमीच चर्चा असते. गुरुवारी रात्री जे काही घडले तो विषय आमच्या पक्षा अंतर्गत आहे. या बैठकीला माजी नगरसेवक, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख यापैकी कुणालाच निमंत्रण नव्हतं. उपस्थिती देखील नगण्य होती. सभेचे हे दृश्य आमच्या पक्षाची पत घालवणारे होते. तेच ज्ञानेश्वर धाने यांना विचारले असता वाद झाला. हा आमचा पक्षांतर्गत विषय असून या वादामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे सुनील खराटे यांनी माध्यमांना सांगितले.
Powered By Sangraha 9.0