बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांना अभिवादन

13 Apr 2024 19:45:43
 

bindal 
 
नागपूर, 
Bindeshwari Mandal मंडल आयोगाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी एका कार्यक्रमात बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांना श्रद्धांजली अर्पण केली. १९७८ साली बी. पी. मंडल यांच्या नेतृत्वात मंडल आयोगाचे सदस्य नागपुरात रवी भवन येथे आले असताना अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यावेळी मंडल यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते, हे विशेष उल्लेखनीय. कलार, कलाल, साव कलार, शिवहरे कलार, गोंड कलाल इत्यादी जातींचा समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. ओबीसींच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आजही प्रयत्न करीत आहोत ही बाब आजच्या नवीन पिढीला कळण्याची आवश्यकता असल्याचे भूषण दडवे यांनी सांगितले.
सौजन्य  : राजेश हरडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0