दुचाकी अपघातात चालक जखमी

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
कारंजा लाड, 
two wheeler accident दुचाकी अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १४ एप्रिल ला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अनई फाट्याजवळ घडली. नथू जयराम जाधव (वय ४५) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव असून तो कारंजा तालुयातील सोमठाणा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
 

yrtyry 
 
two wheeler accident जखमी दुचाकी चालक दुचाकीने प्रवास करीत असताना अचानकपणे त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि खाली पडून तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.