अन्न, अन्नदान, अन्नाद्भवंति भूतानी!

17 Apr 2024 04:26:38
धर्म-संस्कृती 
 
 
- प्रा. दिलीप जोशी
Food-Culture-Hindu हिंदू संस्कृतीत अन्नाला ‘पूर्णब्रह्म' म्हटले आहे तर अन्नदानाला ‘पुण्यकर्म' म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत दानाचे महत्त्व अनादिकाळापासून आहे. भूदान, गोदान, सुवर्णदान, जलकुंभदान सोबतच अन्नदान; हे दान तर अतिमहत्त्वाचे आहे. हल्ली रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदानालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. Food-Culture-Hindu सध्या देशभरात होऊ घातलेल्या निवडणुका पाहता ‘मतदान' हे दानदेखील राष्ट्रकर्म आहे. सर्वच दाने अत्यंत महत्त्वाचे, आवश्यक आणि गरजेचे आहेत. पुण्यकर्म म्हणून याकडे पाहिले जाते. प्रत्येक दानाचे आपापले वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. Food-Culture-Hindu त्यातल्या त्यात अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतर दानात दाता आणि भोक्ता यांना म्हणावी तशी तृप्ती मिळत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला आपण पैशाचे दान करायचे ठरवले आणि त्याला पैसे द्यायला सुरुवात केली. Food-Culture-Hindu समजा आपण त्याला शंभर रुपये दिले आणि विचारले, ‘अजून देऊ का?' तर तो ‘हो'च म्हणेल. तुम्ही त्याला हजार द्या की लाख-कोटी द्या की अब्ज द्या. त्याच्या तोंडून ‘बस! पुरे आता!' हा शब्द येणारच नाही. हीच अवस्था इतर दानातही अनुभवास येईल. कितीही द्या तरीही तृप्ती नाहीच.Food-Culture-Hindu
 
 
Food-Culture-Hindu
 
अन्नदानात मात्र वेगळा अनुभव येईल. समजा आपण एखाद्याला अन्नदान करायचे ठरवले. त्याला पाटावर बसवले. जेवणाचे, पंचपक्वान्नाचे ताट त्याला दिले. त्याचे जेवण सुरू झाल्यावर त्याला एक पोळी वाढा. तो ‘हो' म्हणेल. अजून एक वाढा. तो ‘हो' म्हणेल. आता अजून एकचा आग्रह करा. Food-Culture-Hindu तो सहज ‘नको नं' म्हणेल. केलाच आग्रह तर घेईलही एखादी पोळी. आता पुन्हा पोळी न्या आणि आग्रह करा. तो ठाम नाही म्हणेल. तुम्ही जबरदस्तीचा आग्रह केला तर हात ताटावर धरून नाही म्हणेल, आपले ताट पाटाखाली लोटेल आणि काकुळतीला येऊन नाही म्हणेल. तरीही तुम्ही आग्रह केला तर तुमच्यावर क्रोधायमान होऊन आरडाओरडा करून ‘अरे! नको म्हटल नं! वाया जाईलनं! सांगितलेलं समजत नाही का?' Food-Culture-Hindu असे म्हणून जोरदार नकार देईल. याला म्हणतात संपूर्ण तृप्ती. ज्या दानात नकारासाठी हात आडवे येतात, जे दान नको म्हणून रागावल्या जाते, ज्या दानाने समोरचा महातृप्त होतो; ते एकमेवाद्वितीय दान म्हणजे अन्नदान होय. म्हणून ‘अन्नदान हे सर्वश्रेष्ठ' दान म्हणून मान्यता आहे.
 
 
 
Food-Culture-Hindu श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच स्पष्ट केलं की, ‘अन्नाद्भवंति भूतानी' संपूर्ण भूतमात्र अन्नावरच अवलंबून आहे; सोबतच श्रीमद्भगवद्गीता अन्न चार प्रकारचे असल्याचे स्पष्ट करते.
अहं वैश्वानरो भुत्वा, प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम।।
‘चतुर्विधम अन्नम' म्हणजे चार प्रकारांचे अन्न आपण खात असतो. भक्ष, पेय्य, चोष्य आणि लेय्य हे ते चार प्रकार आहेत. भक्ष म्हणजे जे पदार्थ दातांनी तोडून खातो.Food-Culture-Hindu  उदा. पोळी आपण दातांनी तोडून खातो म्हणून पोळीला भक्ष अन्न म्हणावे. पेय्य म्हणजे पिऊन ग्रहण केले जाणारे अन्न. पाणी, दूध असे पातळ पदार्थ या प्रकारात बसतात. चोष्य म्हणजे चोखून खाण्याचे पदार्थ. जसे ऊस आपण चोखून खातो. शेवटचा प्रकार लेय्य म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ. या प्रकारात लोणची वगैरे येतात. हे चार प्रकारांचे अन्न परिपूर्ण आहार असून ते शरीराला पुष्ट करते. ‘शरीरं आद्यं खलु धर्म साधनं।' शरीर पुष्ट करणारे दान म्हणूनही अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. भूतमात्राचा विचार केला तर दोन प्रकारांचे प्राणी आहेत. Food-Culture-Hindu शाकाहारी आणि मांसाहारी. त्यांच्या पाणी पिण्याच्या पद्धतीत फरक आहे.
 
 
मांसाहारी ते प्राणी की जे जिभेने पाणी पितात. पिताना चटक चटक आवाज येतो. उदा. वाघ, सिंह, कोल्हा, मांजर, कुत्रा इत्यादी प्राणी मांसाहारी आहेत. Food-Culture-Hindu दुसरा प्रकार शाकाहारी प्राणी; जे ओठांनी पाणी पितात. उदा. गाय, घोडा, म्हैस इत्यादी. हे प्राणी पाणी पिताना ओठांचा वापर करीत असल्याने कुठलाही आवाज होत नाही. आपण माणूस म्हणून पाणी पिताना ओठांनीच पितो. त्यामुळे आपले मूळ शाकाहारी म्हणून आहोत. गाय, बैल, घोडा यांनी आपला मूळ पिंड कधीच सोडला नाही. ते केवळ शाकाहार करतात. त्यांच्यासमोर मांस ठेवले तरी ते ग्रहण करीत नाही. Food-Culture-Hindu या विवेकाचा माणसाजवळ अभाव दिसतो. माणूस आपला पिंड सोडून मांसाहार करीत असल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक चढ-उतारात अडकला आहे. आपल्या शरीराला उपयुक्त अन्नग्रहण केल्यास  sound mind in sound body होईल. जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता. दुर्बलता म्हणजे महापाप आणि सुदृढता म्हणजे महापुण्य. म्हणून मित्रांनो बलवान व्हा ! स्वामी विवेकानंदांचा हा संदेश महत्त्वाचा आहे. सुदृढता म्हणजे शरीर आणि मनाची सुदृढता. त्यासाठी अन्न महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे माणूस म्हणून आपण आपले मूळ अन्न म्हणजे शाकाहार ग्रहण केला पाहिजे.Food-Culture-Hindu
 
 
 
आपल्या संस्कृतीत जेवण म्हणजे उदरभरण नसून ते यज्ञकर्म म्हटले आहे. जठराग्नीला हे हविषांन्नच आहे. ते देह पुष्ट करते. शास्त्रामध्ये चार प्रकारांचे देह सांगितले आहेत. स्थूलदेह, सुक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारण देह. या चारही देहांचे पुष्टीकरण म्हणजे ‘जाणिजे यज्ञकर्म' होय. Food-Culture-Hindu आपल्या संस्कृतीत जे सोळा संस्कार आहेत त्यात ‘अन्न प्राशन' नावाचा एक महत्त्वाचा संस्कार आहे. तो विधिपूर्वक केला जातो. यावरून अन्नाच्या बाबतीत भारतीय संस्कृती किती गंभीर आहे, हे लक्षात येईल. पोट भरलेले असेल तरच पोटाच्या वर असलेले हृदय म्हणजे मन आणि त्याच्याही वर असलेला मेंदू म्हणजे बुद्धी सशक्त राहते. म्हणजे मन, मस्तिष्क आणि मनगटाच्या सुदृढतेचा मार्ग पोटातून जातो. Food-Culture-Hindu लक्षात ठेवा, पोटाला अनेक जण ‘पापी पेट का सवाल' म्हणतात. पेट पापी नसून पुण्यवान आहे. म्हणून तर सर्व प्रकारांचे अन्न पोट पचवते. पापी तर आपण आहोत की आपल्याला साखर, आंबट, तिखट आदी पथ्य पाळावे लागते.
 
 
 
अन्न वाया घालवू नये; ते लागेल तेवढेच घ्या, भुकेल्याला अन्नदान करा, हे सुसंस्कार आपल्या घरात आणि समाजात सहज होताना दिसतात.Food-Culture-Hindu
आपण यथेच्छ जेवणे। उरले ते वाटणे
परंतु वाया दवडणे। हा धर्म नव्हे।।
अन्न वाया घालवणे म्हणजे अधर्म असे संत म्हणतात. म्हणून अन्न आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे. अन्नग्रहणातून मिळालेली ऊर्जा सत्कारणी लागली तरच जीवनाचे सार्थक आहे. Food-Culture-Hindu म्हणूनच तर आपण नेहमी जेवणापूर्वी लक्षात ठेवूया!
मुखी घास घेता, करावा विचार।
कशासाठी मी, अन्न हे सेवणार
घडो माझिया हातुनी, देशसेवा।
म्हणोनी मिळावी मला शक्ती देवा।।
९८२२२६२७३५
Powered By Sangraha 9.0